Kadamba Smart Pass Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport Scheme: खूषखबर..! कंदबतर्फे कामगारांना बस प्रवासात 50 टक्के सूट, लाखो लाभार्थ्यांना मिळणार लाभ; योजना अंतिम टप्प्यात

Kadamba Transport Scheme For Employees: मनुष्‍यबळ विकास महामंडळ (जीएचआरडीसी) आणि राज्‍यात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत केंद्रीय कर्मचारी यांना कदंब महामंडळातर्फे बस प्रवासात ५० टक्‍के सूट देण्‍यात येणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: खासगी कंपन्‍या, आस्‍थापनांमधील महिला कर्मचाऱ्यांसह कंपन्‍या, आस्‍थापनांकडे नोंदणी असलेले सर्व कामगार तसेच मनुष्‍यबळ विकास महामंडळ (जीएचआरडीसी) आणि राज्‍यात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत केंद्रीय कर्मचारी यांना कदंब महामंडळातर्फे बस प्रवासात ५० टक्‍के सूट देण्‍यात येणार आहे.

कदंब महामंडळाकडून योजना अंतिम टप्‍प्‍यात आली असून, लवकरच सरकारकडून या योजनेची घोषणा करण्‍यात येणार आहे. या योजनेचा राज्‍यातील लाखो कामगारांना (Employees) फायदा मिळणार आहे. महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहन कासकर यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले, पावसाळी अधिवेशनात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या महिलांना बस प्रवासात ५० टक्‍के सूट देण्‍याची घोषणा केली होती.

चार स्‍तरांमधील कामगारांना कदंब (Kadamba) बसेससह सरकारच्‍या ‘माझी बस’ योजनेअंतर्गत ज्‍या बसेस सुरू आहेत, त्‍यातील प्रवासातही ५० टक्‍के सूट मिळणार आहे. या योजनेमुळे अधिकाधिक कामगार वर्ग कदंब बसच्‍या प्रवासाकडे वळून त्‍यांनाही प्रवासात सूट मिळेल. शिवाय कदंब महामंडळालाही आर्थिक फायदा होईल, असेही कासकर यांनी सांगितले.

या योजनेची प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात पोहोचली असून, लवकरच योजनेची घोषणा करण्‍यात येईल. त्‍यानंतर या चारही विभागांतील कामगारांना कदंब महामंडळाकडून स्‍मार्ट कार्ड देण्‍यात येईल. त्‍याद्वारे त्‍यांना प्रवासात ५० टक्‍के सूट देण्‍यात येईल, असे कासकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohini Kalam: क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

SCROLL FOR NEXT