Goa Kadamba Transport  Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: प्रवासी तिकीट आजपासून डिजिटल

कदंब (kadamba) बसमधून प्रवास करताना आता सुटे पैसे बाळगण्याची चिंता करण्याची गरज नाही. आता ‘पेटीएम’ने कदंबचे बसभाडे देता येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कदंब (Kadamba Bus) बसमधून प्रवास करताना आता सुटे पैसे बाळगण्याची चिंता करण्याची गरज नाही. कदंबचे तिकीट आजपासून डिजिटल होत आहे. पेटीएम (Paytm) या पेमेंट ॲपसोबत कदंबने सामंजस्य करार केला असून या ॲपच्या माध्यमातून प्रवासी आता तिकिटाची रक्कम अदा करू शकतील. कदंबचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले, की पणजीच्या बसस्थानकावर कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा या नव्या प्रणालीची सुरवात करणार आहे. (Kadamba bus ticket in Goa is going digital from today)

कदंब महामंडळाच्या सर्व बसगाड्या सोमवार म्हणजे 19 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत. कदंब महामंडळाचे सरव्यावस्थापक संजय घाटे यांनी तसा आदेश नुकताच काढला आहे. मात्र, कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेने महामंडळाच्या या निर्णयाला आक्षेप घेतला असून प्रवासी रस्त्यावर नसताना सर्व बसगाड्या एकाचवेळी सुरू न करता टप्प्याटप्याने बसगाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे.

घाटे यांनी काढलेल्या आदेशात, कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने 29 मार्च 21 पासून कदंबच्या बसगाड्या बंद ठेवाव्या लागल्या होत्या. 50 टक्के प्रवासी घेऊन बसगाड्या चालू करण्याचा निर्णय झाल्यानंतर कदंबच्या काही बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. आता राज्यात कोरोना बराच नियंत्रणात आलेला असल्यामुळे कदंब महामंडळाने सर्वच्या सर्व बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 19 जुलैपासून गोव्यातील विविध गावात जाणाऱ्या तसेच इतर राज्यात ये - जा करणाऱ्या अशा सर्वच बसेस सुरू होणार आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी 18 जुलै रोजी तयार राहावे, असे म्हटले आहे.

कर्नाटकच्या काही बसगाड्या सुरू

कर्नाटक सरकारने तेथील काही भागात एसटी बसगाड्या सुरू केल्या आहेत. गोव्यात येणाऱ्या काही एसटी बसगाड्या सुरू झालेल्या असून अद्याप पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. राज्याच्या सीमेवर कोरोना नेगेटिव्ह प्रमाणपत्र सर्व प्रवाशांनाही विचारले जात असल्याने एसटीना अद्याप पुरेसे प्रवासी मिळत नाहीत.

नुकसानीची शक्यता

राज्यात अद्यापही कोरोनाच्या भयाने प्रवासी घराबाहेर पडत नाहीत. सध्या सुरू असलेल्या अवघ्याच बसगाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. अशावेळी कदंब महामंडळ सर्व बसगाड्या सुरू करुन नुकसान करून घेणार आहे. त्यामुळे सर्व बसगाड्या एकाचवेळी सुरू करण्यास आमचा आक्षेप आहे. त्यापेक्षा टप्प्याटप्प्याने कदंबच्या बसागाड्या सुरू कराव्यात. प्रवासी जास्त येऊ लागले की इतर बसगाड्या सुरू कराव्यात, अशी कर्मचारी संघटनेची भूमिका असल्याचे कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 10 November 2024: धनाची प्राप्ती होईल, तरीही अनावश्यक खर्च टाळा जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Goa Murder Case: मांडवी पूलाखाली परप्रांतीय कामगाराचा खून, आरोपी फरार

Ramanuj Mukherjee: गोवा पर्यटनाबाबत वादग्रस्त आकडेवारी शेअर करणारे रामानुज मुखर्जी आहेत तरी कोण?

कस्टम अधिकाऱ्यांकडून विदेशी नागरिकाची लुबाडणूक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस चिडले, म्हणाले...

Shefali Vaidya: 'खरा गोवा' समजावून सांगतानाच शेफाली वैद्य यांची भाजप सरकारला कळकळीची विनंती; वाचा नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT