MLA Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Divya Rane: आरक्षणामुळे देशातील नारीशक्तीला न्याय!

Divya Rane: आमदार दिव्या राणे : वाळपईत सार्वजनिक हळदीकुंकू उत्साहात

दैनिक गोमन्तक

Divya Rane: देशात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात सर्वांगीण विकास झाला आहे. हे पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाले आहे. पूर्वी महिला घरच संभाळत असत. बदलत्या काळात महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. गोव्यात विविध निवडणुकांतही महिलांना आरक्षण मिळाले आहे.

त्यामुळे नारी शक्ती प्रचंड जागरुक झाली असून भाजपमुळेच देशातील महिलांना खरा न्याय मिळाला आहे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

वाळपई नगरपालिका सभामंडपात आयोजित पालिका क्षेत्रातील सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रमात आज बुधवारी त्या बोलत होत्या. वाळपई नगराध्यक्षा प्रसन्ना गावस, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, नगरसेविका शेहझीन शेख, नगरसेवक रामदास शिरोडकर,

विनोद हळदणकर, निर्मला साखळकर, शराफत खान, वसूउद्दीन सय्यद, भिरोंडा सरपंच उदयसिंह राणे, पत्रकार उदय सावंत आदींची उपस्थिती होती.

राणे पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला सुधारत आहेत. महिलांच्या कतृत्त्वामुळेही देश विकासपथावर आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये असे राणे म्हणाल्या. नगराध्यक्षा सौ. प्रसन्ना गावस यांनी स्वागत केले. सौ. गौतमी गावस यांनी सूत्रनिवेदन केले. यावेळी हजारो संख्येने महिलांची उपस्थिती होती.

भाजपमुळेच देशात विकास !

भाजप सरकार आल्यापासून विकास होऊ लागला आहे. रस्ते, पूल सुधारले आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट, मनोरा अशा माध्यमातून डिजीटल सेवेचा लाभ होत आहे. घराघरात सिलींडर सारखी उर्जा पोहचल्याने घरे धूर मुक्त झालेली आहेत. कोणीही समाजाचे राजकारण करू नये. गोव्यात लाडली लक्ष्मी योजनेद्वारे मुलीचे विवाह कार्य सामान्य जनतेसाठी सुलभ बनले आहे. म्हणूनच एकंदरीत राज्यात सर्वांगीण विकास भाजपमुळेच शक्य झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT