Illegal Construction: हरमल सरपंचांवर संक्रांत !

Illegal Construction: अवैध बांधकाम भोवले: अपात्रतेची टांगती तलवार
Court
Court Dainik Gomantak

Illegal Construction: पेडणे तालुक्यातील किनारपट्टी भागातील हरमल पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर मालमत्ताप्रकरणी राजीनामा दिलेले सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांच्यावर सध्या अपात्रतेची टांगती तलवार असल्याने घडामोडींकडे लोकांचे लक्ष लागून आहे. गेल्या निवडणुकीत गिरकरवाडा प्रभाग 4 मधून त्याची बिनविरोध निवड झाली होती. त्यापूर्वीच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

या भागात विकास प्रतिबंधित क्षेत्रात (एनडीझेड) बेकायदेशीर बांधकामे करून फर्नांडिस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या भागातील १८७ आस्थापनांपैकी फर्नांडिस कुटुंबीयांची ३३ बांधकामे असून, त्यात शॅक्स, रेस्टॉरंट, बार, कॉफे आदी आस्थापने असल्याने न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत.

आपल्या वाट्यातील बांधकामांवर कारवाईस हरकत नसल्याचे माजी सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी सांगितले होते. मात्र, कुटुंबीयातील भाऊ,बहीण व अन्य लोकांची बांधकामे पाडण्याचे आदेश जारी केले आहेत.

Court
Goa Government: राज्याने उद्योग धोरण राबविणे गरजेचे

कायदेशीर कारवाईचा बडगा : डिसोझा

न्यायालयाने दिलेला निर्णय हा अंतिम असतो. बेकायदा मालमत्ता व बांधकामे केल्याचे सकृतदर्शनी दिसल्याने ही कारवाई झाली. पदाचा गैरवापर केल्याने हा प्रकार झाला याला मर्यादा आहेत. अपात्रतेचा निर्णय हा गोव्यातील पंच व अन्य जबाबदार लोकांना धडा असून, त्यांनी अशा प्रकरणांपासून दूर रहायला हवे,असे माजी सरपंच इनसियो डिसोझा यांनी व्यक्त केले.

Court
Goa Crime News: मृताच्‍या हातात लोखंडी प्‍लेट नव्‍हती; दिलीप नाईक खुनाचा झाला उलगडा!

बेकायदा प्रकरणात अपात्र होण्याची वेळ

हरमल पंचायतीचे नऊ सदस्यीय मंडळ असून, प्रारंभी बर्नार्ड फर्नांडिस सत्ताधारी मंडळात नव्हते. मात्र, अन्य पंच सदस्य अननुभवी असल्याने, सर्वांनी बर्नार्ड फर्नांडिस यांना सरपंचपद स्वीकारण्याची विनंती केली. मध्यंतरी ग्रामसभेत उडवाउडवीची उत्तरे दिल्यावरून त्यांना हटवण्याच्या हालचाली झाल्या. दोन महिन्यांपूर्वी न्यायालय आदेशानंतर त्यांनी पदत्याग केला. आता अपात्र ठरवण्याच्या हालचालींची चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com