Mapusa: येथील श्री बोडगेश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवात भाविकांची एकाच वेळी प्रमाणापेक्षा अधिक गर्दी होऊ नये याची खबरदारी देवस्थानच्या कार्यकारी मंडळाने घेतली असली तरी त्या ठिकाणी शेवटी भाविकांनी गर्दी केलीच. त्यातच भरीस भर म्हणजे, म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा (Joshua D'Souza) यांच्या प्रचाराचा (Election Campaign) शुभारंभ जत्रोत्सवाच्या दिवशीच त्याच ठिकाणी करण्यात आल्याने त्या गर्दीत अधिकच भर पडली.
जत्रोत्सवाच्या ठिकाणी कोविडविषयक शासकीय नियमावलीचे पालन होते की नाही, याबाबत पाहणी करून आवश्यक खबरदारी घेण्याबाबत शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर म्हणाले, की आम्ही आमच्या परीने कोविडसंदर्भात सर्व तऱ्हेची काळजी घेतलेली आहे. भाविकांनीही स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
आमदार डिसोझा यांनी श्री बोडगेश्वराच्या जत्रोत्सवानिमित्त देवाला नारळ अर्पण करून जाहीर प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte), म्हापसा नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, पालिकेच्या सत्ताधारी गटातील भाजपपुरस्कृत गटाचे नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. डिसोझा म्हणाले की, मी आज प्रचाराला सुरूवात करीत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आम्ही प्रचार करणार. प्रचारावेळी विरोधकांकडून आरोप होतच राहणार. मात्र, म्हापसेकर अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.