म्हापशात खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच

काँग्रेसतर्फे (Congress) अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांचे नाव पक्षातर्फे जाहीर झालेले आहे.
BJP and Congress
BJP and CongressDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येत्या विधानसभा निवडणुकीत म्हापशातून विविध पक्ष निवडणूक लढवणार असले, तरी खरी रस्सीखेच भाजपचे ज्योशुआ डिसोझा व काँग्रेसचे सुधीर कांदोळकर यांच्यातच होणार आहे, असे एकंदर विद्यमान राजकीय स्थितीवरून प्रकर्षाने जाणवते. सुमारे अडीच वर्षांपूर्वी पोटनिवडणुकीवेळी जी राजकीय स्थिती म्हापशात होती, नेमकी तीच स्थिती यंदाही असेल. कारण मुख्य लढत त्याच दोन्ही पक्षांत आणि त्याच उमेदवारांत होत आहे. विद्यमान आमदाराची निष्क्रियता हाच मुद्दा सध्या सर्व विरोधक उमेदवार मतदारांसमोर मांडत आहेत. (BJP and Congress in Mapusa Latest News)

BJP and Congress
मडगावला गतवैभव मिळवून देण्यास आजगावकर यांचे प्राधान्य..

येत्या निवडणुकीत भाजपतर्फे (BJP) कुणाला उमेदवारी दिली जाईल हे पक्षीय पातळीवरून अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले, तरी ज्योशुआ डिसोझा यांनाच उमेदवारी मिळेल हे सर्वश्रुत आहे. दुसरे म्हणजे भाजपतर्फे उमेदवारीसाठी अन्य कुणीही प्रयत्नशील नाही आणि त्यासंदर्भात कुणी छुपेपणाने प्रयत्नशील असले तरी त्यांच्यापैकी एखाद्याला उमेदवारी मिळण्याची शक्यताच नाही. भाजपतर्फे अन्य संभाव्य उमेदवार म्हणून शुभांगी वायंगणकर, रूपेश कामत, रायन ब्रागांझा, संदीप फळारी, संजय वालावलकर, तुषार टोपले यांची नावे काही जणांकडून पुढे केली जात होती. तथापि, त्या उमेदवारांनी त्याबाबत कोणतीही पूर्वतयारीही केली नाही व त्यामुळे त्यांची नावे आपसूकच मागे पडली आहेत.

काँग्रेसतर्फे (Congress) अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांचे नाव पक्षातर्फे जाहीर झालेले आहे. गेल्या पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांनी सातत्याने प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभाग दर्शवल्याने त्यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरणार आहे. त्यातल्या त्यात भाजपमधील अंतर्गत धुसफूस कांदोळकर यांना लाभदायक ठरणार आहे. स्थानिक आमदाराने स्वत:च्या कार्यकाळात विकासकामे मार्गी न लावणे, जनसंपर्क न ठेवणे, मतदारांच्या फोन कॉलला प्रतिसाद न देणे इत्यादी कमतरता काँग्रेसचे सुधीर कांदोळकर यांना फायदेशीर ठरणार आहेत.

BJP and Congress
Goa Election: 'भाजपला निवडणुकीत पराभूत करण्याचा 'हा' एकच पर्याय'

नगरसेवक तथा म्हापसा गट काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर तसेच डॉ. नूतन बिचोलकर, अन्वी कोरगावकर, कमल डिसोझा व आनंद भाईडकर हे अन्य नगरसेवक या निवडणुकीत कांदोळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने कांदोळकर यांची ती जमेची बाजू आहे. त्याशिवाय, हल्लीच माजी मंत्री मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तेही कांदोळकर यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार राहुल म्हांबरे यांचे प्राबल्य हल्लीच्या काही दिवसांत किंचित वाढत आहे. शिवाय, शिवसेनेचे उमेदवार जितेश कामत हे स्वत:च्या परीने प्रचारकार्यात उतरलेले आहे. त्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना किती मते मिळतात यावरच काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. तृणमूल काँग्रेसच्या हितचिंतकांना सध्या तरी या मतदारसंघात कुणीच वाली नाही.

BJP and Congress
गोव्यात पूर्ण बहुमत न मिळाल्यास..: अरविंद केजरीवाल

यंदा सहानुभूतीची लाट नाहीच!

सामाजिक कार्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना विद्यमान भाजप आमदार ज्योशुआ डिसोझा हे स्वत:चे दिवंगत पिता असलेले तत्कालीन आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रांसिस ऊर्फ बाबूश डिसोझा यांच्या निधनानंतर सहानभूतीच्या लाटेच्या साहाय्याने सुमारे अडीच वर्षांपूर्वी निवडून आले होते, ही वस्तुस्थिती आहे. तथापि निवडून आल्यानंतर फारशी विकासकामे व नियोजित प्रकल्प मार्गी लावणे त्यांना शक्य झाले नाही, असे स्थानिक मतदारांचे म्हणणे आहे. आता यापुढे त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा लाभ होणारच नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मतदारसंघातील समस्या

दीर्घकाळ रखडलेला मलनिस्सारण प्रकल्प, पार्किंगची समस्या, बाजारपेठेतील नियोजनाबाबत पालिकेकडून होणारे दुर्लक्ष, बाजारपेठेतील बहुतांश दुकानदार व विक्रेत्यांचा बेशिस्त कारभार, नवीन बसस्थानकाचे रखडलेले काम, भूमिगत वीजवाहिन्या, रवींद्र भवन प्रकल्प, तार नदीचे प्रदूषण, सार्वजनिक क्रीडा मैदानांचा अभाव, अपुरा तथा अनियमित पाणीपुरवठा, खंडित वीजपुरवठा, अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दैना, गणेशमूती विसर्जनासाठी पवित्र स्थळाचा अभाव आदी समस्यांबाबत म्हापसावासीय सध्या आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्यावर सर्व विरोधी उमेदवार टीका करीत आहेत.

- सुदेश आर्लेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com