CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

नोकरीची पदे गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील; CM प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आजपासुन पावसाळी आधिवेशन सुरू झाले, दरम्यान आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. जानेवारी 2022 पर्यंत ज्या नोकरीच्या पदांसाठीची जाहिरात झालेली नाही, तसेच त्यानंतर तयार झालेली नोकरीची पदे गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील. आमदार विरेश बोरकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले.

(Job vacancies will be filled through Goa Staff Recruitment Commission; CM Pramod Sawant)

यापुढील नोकरी कर्मचारी भरती आयोगामार्फत होणार

जानेवारी 2022 पर्यंत ज्या पदांची जाहिरात झालेली नाही, तसेच त्यानंतर जाहिर करण्यात आलेली नोकरीची पदे गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील. आशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी दिली.

दुसरीकडे, काँग्रेसच्या बैठकांबद्दल पत्रकारांनी राजेश फळदेसाईंना विचारले असता, ते म्हणाले की, काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीबद्दल मला काहीच माहीत नव्हते. पण मी अजूनही कॉंग्रेसमध्येच आहे. मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो नव्हतो. मी त्यावेळी माझ्या घरी झोपलो होतो. त्यामुळे याबद्दल मला काहीही कल्पना नाही.'

त्यांच्या या अजब विधानामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता नुकसानग्रस्त गोवेकरांच्या मदतीसाठी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हात पुढे केला आहे. गोव्यात अनेक ठिकाणी, घरांवर झाडे पडून तसेच, घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या, ज्यात गोवेकरांचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना उपाय म्हणून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

गोव्यात आता राजकीय संकट निर्माण झाले आहे. गोवा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चा भाजप आमदारांनी जरी खोडून काढल्या असल्या तरी सुद्धा घडत असलेला घडामोडींमुळे तथ्यता समोर येत नाही.

या सगळ्याला भाजपच दोषी असून भाजप आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले, 'आम्हाला कुणाचीही गरज नाही. आमचे 25 आमदारांसोबतचे स्थिर भाजप सरकार गोव्यात स्थापन झाले आहे. आता काँग्रेसकडे करण्यासाठी काहीही नसल्यामुळे ते सध्या दोष देण्याचा ड्रामा करत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT