वास्कोतील धार्मिक संघर्ष पूर्वनियोजित

सरकारचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष : ‘सिटीझन्स इनिशिएटिव्ह फॉर कम्युनल हार्मनी’चा अहवाल
Goa Vasco
Goa Vasco Danik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वास्कोत 10 एप्रिल 2022 रोजी दोन धर्मांच्‍या समुदायात झालेल्या संघर्षामागे संशयास्पद पूर्वपीठिका असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचे चिथावणीखोर वर्तन असून राज्य सरकारने या संघटनेच्या समाजविरोधी कृतीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा निष्कर्ष ‘सिटीझन्स इनिशिएटिव्ह फॉर कम्युनल हार्मनी’ या संस्थेने काढला आहे.

(Pre-planned religious conflict in Vasco)

Goa Vasco
गोव्यात राजकीय घडामोडीला वेग; कॉंग्रेसचे काही आमदार नॉट रिचेबल

शिक्षणतज्ज्ञ आणि वास्तुविशारद तलुल्ला डिसिल्वा, अॅड. सारंग उगाळमुगळे, संशोधक अमिता काणेकर आणि मानवी हक्क कार्यकर्ती अॅड. आल्बेर्टिना आल्मेदा यांचा समावेश असलेल्या यांच्या सत्यशोधन पथकाद्वारे या घटनेशी संबंधित व्यक्तींशी तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधून व घटनास्थळाची पाहणी करून सदर घटना म्हणजे धार्मिक संघर्ष पेटवण्यासाठी केलेली नियोजनबद्ध कृती असल्याचे संस्थेने आज प्रसारित केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काय घडले होते ‘त्‍या’ दिवशी?

रामनवमी शोभायात्रेच्या नावाखाली ‘केसरिया हिंदू वाहिनी’ या गोमंतकीय हिंदूंच्या धार्मिक उत्सवातील सहभागाचा कोणताही पूर्वेतिहास नसलेल्या संघटनेने परवानगी नसलेल्या मार्गावरून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना फिरवले, वाटेत मुस्‍लिम धर्मियांच्या प्रार्थनास्थळांसमोर थांबून रमझाननिमित्त सायंप्रार्थना सुरू असताना मोठमोठ्याने घोषणा देण्यात आल्या तसेच इस्लामपूर येथील अल अक्सा मशिदीत भगवे झेंडे हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने प्रवेश करून चिथावणीखोर घोषणा दिल्या.

या सर्व प्रकारावरून ही शोभायात्रा धार्मिक उद्देशाने काढण्यात आली नव्हती तर धार्मिक कलह निर्माण करणे हाच तिचा हेतू होता, असे हा अहवाल म्हणतो. सांकवाळ चर्च असलेल्या ठिकाणी पुरातनकालीन असलेल्या विजयदुर्गा मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी हिंदूंचे संघटन घडविण्यासाठी जमविण्याचे आवाहनही शोभायात्रेसाठी प्रसारित करण्यात आलेल्या निमंत्रणात होते, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

Goa Vasco
नेटकऱ्यांकडून काँग्रेस नेते धारेवर!

कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना रान मोकळे

सत्तेशी जवळीक असलेल्यांना कायदेभंगाची सवलत मिळते हे या घटनेने सिद्ध झाले आहे. प्रशासनाने आयोजकांचा पूर्वेतिहास न तपासता त्यांना परवानगी तर दिलीच पण नंतरही पोलिसांनी निवडक एफआयआरच्या अनुषंगाने केवळ मुस्लिम समुदायातील व्यक्तींची धरपकड केली. या घटनेत गुंतलेल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांना प्रशासनाने मोकळे रान दिल्याचा निष्कर्षही अहवालात काढण्यात आला आहे. आतादेखील पोलिस तपास अत्यंत अपारदर्शक पद्धतीने केला जात असल्याचा दावा सत्यशोधन समितीने केला आहे.

अल्पसंख्याक समुदायामध्ये भीती

देशभरात हिंदू सणांच्या निमित्ताने अशीच कार्यपद्धती वापरून अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. गोव्यातील बेरोजगारीच्या आडोशाने गोमंतकीय तरुणांना चिथावणी देत धर्मद्वेशी राजकारण केले जात आहे. त्याला प्रभावशाली व्यक्तींची साथ मिळत असल्याने अशा प्रकारांची पुनरावृत्ती घडण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com