Church Dainik Gomantak
गोवा

झारखंडमधील ख्रिश्चन धर्मीय तीर्थयात्रेसाठी गोव्यात येणार, खर्च राज्य सरकार उचलणार

अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Pramod Yadav

ख्रिश्चन धर्मातील बीपीएल वृद्ध लोकांसाठी झारखंड राज्य सरकार तीर्थयात्रा आयोजित करणार आहे. पर्यटन, कला, संस्कृती आणि क्रीडा विभागाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत यावर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वृद्धांना गोव्यात तीर्थयात्रेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात बीपीएल ज्येष्ठांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

झारखंड टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने बीपीएल श्रेणीतील लाभार्थी यात्रेकरूंना राज्यातील ख्रिश्चन अनुयायांसाठी विशेष ट्रेनने गोव्यात यात्रेला नेण्यात येणार आहे. राज्यभरातून 1000 लोकांना गोव्याला पाठवले जाणार आहे.

यात्रेसाठी यात्रेकरूचे वय 60 वर्षांच्या वरती तो झारखंड राज्याचा कायमचा रहिवासी असावा. यात्रेकरू हा बीपीएल श्रेणी अंतर्गत आला पाहिजे आणि करदाता नसावा. यात्रेकरूने या प्रकारच्या तीर्थ दर्शन योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा, फक्त अशा यात्रेकरूंना तीर्थक्षेत्रात पाठवले जाईल. असे सरकारने स्पष्ट केले आहे.

गोव्यातील ख्रिश्चन तीर्थक्षेत्रात सात ते दहा दिवसांची सहल आयोजित करण्यात येणार असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान, लोक वेगवेगळ्या चर्चला भेट देतील. निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था शासनाकडून केली जाणार. जिल्ह्यातून तीर्थक्षेत्र आणि परतीच्या प्रवासाचा खर्चही सरकार उचलणार आहे.

तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला विहित नमुन्यात डुप्लिकेटमध्ये अर्ज करावा लागेल. मूळ वैद्यकीय प्रमाणपत्रासह 2 छायाचित्रांसह फिट फॉर ट्रॅव्हल सर्टिफिकेट जवळच्या गटविकास अधिकाऱ्याकडे सादर करावे लागेल. त्यानंतर जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीद्वारे यात्रेकरूंची निवड केली जाईल. 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर यात्रेकरूंची निवड केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT