Jambavali Shimgotsava celebrated with pomp in goa
Jambavali Shimgotsava celebrated with pomp in goa Dainik Gomantak
गोवा

जांबावलीत गुलालोत्सव जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्यातील प्रसिद्ध असा जांबावली शिमगोत्सवातील गुलालोत्सव मंगळवारी श्री रामनाथ दामोदर देवस्‍थानच्‍या प्रांगणात जल्लोषात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’’ या जयघोषात व ‘‘राम राघव गोविंदा, हरी रे रमणा, गोविंद माधव गोविंद हरी रमणा’’ असा गजर करीत पालखीत विराजमान झालेल्या श्री दामोदर देवाच्‍या मूर्तीवर जमलेल्‍या हजारो भाविकांनी गुलाल उधळला तसेच एकमेकांना गुलाल लावण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यामुळे जांबावली परिसर गुलाबी रंगाने आच्छादला गेला व गुलाल आसमंतात पसरला गेला. (Jambavali Shimgotsava celebrated with pomp in goa)

गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे गुलालोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला. पण यंदा कोविड (COVID-19) महामारी आटोक्‍यात आल्‍यामुळे भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. अबालवृद्धांनी यांनी जात, धर्म, पंथ व आपसातील सर्व मदभेद विसरुन गुलालोत्सवात सहभाग घेतला. दुपारी 3:30 वाजता श्री रामनाथ मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या पालखीतील श्री दामबाबच्या मूर्तीवर गुलाल उधळण्यात आला व नंतर गुलालोत्सवाला प्रारंभ झाला. संध्याकाळी 5 वाजता पालखी वाजत-गाजत श्री दामोदर मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आली व अनेक भक्तांनी पालखीभोवती पिंगा खेळून वातावरण अधिक रंगतदार केले.

काल सकाळपासूनच मडगावसह गोव्यातील इतर भागातून भाविक जांबावलीत यायला सुरवात झाली. शेजारच्‍या राज्‍यांतूनही मोठ्या संख्‍येने भाविक आले होते. त्‍यामुळे वाहतुकीची थोडी कोंडी झाली. मात्र पोलिसांनी योग्य उपाययोजना केल्‍यामुळे त्‍यावर त्‍याचा मोठा परिणाम झाला नाही. तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडता गुलालोत्सव शांततेत व शिस्तीत पार पडला.

कुशावतीच्‍या पाणवठ्यावर स्‍नानासाठी गर्दी

गुलालोत्सवानंतर स्नान करण्यासाठी कुशावती नदीच्या (River) पाणवठ्यावर भाविकांची एकच गर्दी झाली होती. काही लोकांनी स्नानासाठी रिवण येथील झऱ्याच्या कूच केली. भाविक संध्याकाळीही श्री दामबाबच्या दर्शनासाठी जांबावलीला येत होते. त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत जांबावलीत भाविकांची गर्दी होती. तसेच उशिरापर्यंत दुकाने उघडी होती.

जांबावलीत धामधूम, मडगावात सामसूम

दुपारी जांबावलीत गुलालोत्सवानिमित्त धामधूम पण संध्याकाळी मडगावात (Margao) सगळीकडे सामसूम वातावरण होते. बाजारकरांनी वर्षपद्धतीप्रमाणे आपली दुकाने बंद करून गुलालोत्सवासाठी जांबावलीला प्रयाण केले. तर मडगावातील खासगी व सरकारी कार्यालयांतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी अर्धा दिवस सुट्टी घेतली होती. रात्री 10 वाजता नवरदेवाची वरात व नंतर 12 वाजता संगीत सभा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT