Ratnagiri Accident Dainik Gomantak
गोवा

Ratnagiri Accident: गोवा, कोकण फिरण्याचा प्लॅन पण रत्नागिरीत झाला भीषण अपघात, सहा पर्यटक जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरती कोदवली उपकेंद्रासमोर हा अपघात झाला.

Pramod Yadav

Ratnagiri Accident: गोवा आणि कोकण येथे पर्यटनासाठी येत अससेल्या पर्यटकांचा मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. गोव्याकडून मुंबईला जात असताना खाजगी बस आणि पर्यटकांची कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे.

कोकण आणि गोवा फिरण्यासाठी आलेले सर्व पर्यटक जालना येथील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

(Jalna Tourist Car Accident at Ratnagiri )

योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे, साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे (सर्व रा. जालना) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरती कोदवली उपकेंद्रासमोर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास खाजगी कार आणि खाजगी बस यांच्यात अपघात झाला. खाजगी कार मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होती तर, खाजगी बस गोव्यावरुन मुंबईकडे जात असताना अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींना तात्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर कारचालक हा कारमध्येच अडकून पडला. मात्र, स्थानिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. राजापूर पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव तात्काळ धाव घेऊन मदत कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT