Khotigao Jaggery Production goa Dainik Gomantak
गोवा

Canacona: गोमंतकीय 'गुळाची' ख्याती देशाबाहेर! खोतीगावच्या सेंद्रिय उत्पादनाला परदेशातही मागणी

Khotigao Jaggery Production: काणकोणातील खोतीगावात तयार होणाऱ्या गुळाला परदेशातही मोठी मागणी आहे. स्‍थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने माजी सरपंच उमेश गावकर यांनी विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले.

Sameer Panditrao

Cancona Jaggery Production goa

काणकोण: काणकोणातील खोतीगावात तयार होणाऱ्या गुळाला परदेशातही मोठी मागणी आहे. स्‍थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने खोतीगावचे माजी सरपंच दया ऊर्फ उमेश गावकर यांनी विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले. त्यांनीच सुरू केलेल्या या सेंद्रिय (ऑर्गेनिक) गूळ उपक्रमातून गावातील पंचवीस जणांना रोजगार मिळाला आहे. सहा महिन्यांत तीन टन गुळाचे उत्पादन ते घेतात. शिवाय काकवीचे उत्पादनही करतात.

१९१९ साली स्वतःचे भागभांडवल घालून गावकर यांनी ऑर्गेनिक गूळ तयार करण्याचा छोटेखानी उद्योग उभारला. आता केंद्र सरकारच्या ‘नवनिर्माण वंदन विकास’ योजनेच्‍या सहकार्याने त्यांनी उद्योगाचा विस्तार केला. संजीवनी साखर कारखाना बंद पडल्याने गावात उत्पादित होणाऱ्या उसाला मागणी नव्हती. आता गावात शेतकऱ्यांकडून उत्पादित केलेला ऊस खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा योग्य भाव दिला जातो.

ऑर्किड फूल बागायतीत लाखो रुपयांची नुकसानी होऊनही गावकर यांनी न डगमगता त्या जमिनीत ऊस व हळद शेतीची लागवड केली. स्वतः तयार केलेल्या हळदीची पावडर करून स्वयंसाहाय्य गटातर्फे त्यांची विक्री केली. शिवाय येडा-खोतीगाव येथे सर्व ऑर्गेनिक उत्पादने मिळणारे विक्री केंद्र सुरू केले आहे.

दया गावकर हे पदवीधर असून येडाकान्न देवी संघ, पार्वती परिवार यांच्या माध्यमातून स्‍वयंसाहाय्‍य गटाच्‍या सहकार्याने फणस, ओटंब, कोकम यावर प्रक्रिया करणारे अनेक उपक्रम राबवले. फणसाच्या आटल्यापासून पीठ तयार करून त्याचे पौष्टिक लाडू बनवणे, फणसाच्या चिप्स तयार करणे यासारखे उपक्रम हाती घेतले.

‘पार्वती’ परिवाराचे मिळते सहकार्य

दया गावकर यांच्‍या कारखान्‍यात तयार होणारा सेंद्रिय गूळ राज्यातील वेगवेगळ्या गावां‍मधील चाळीस दुकानांवर उपलब्ध आहे. गावकर यांची पत्नी मीना गावकर या ‘पार्वती’ परिवारातर्फे रानभाज्या पाककृती कार्यशाळा आयोजित करतात. त्याचप्रमाणे गुळापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही त्‍या देतात. या कार्यशाळांना राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दया गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT