Canacona Scrapyard Demolition
Canacona Scrapyard Demolition Canva

Canacona: ..अखेर काणकोण पालिकेने केली कारवाई! जनरेट्यामुळे बेकायदा भंगारअड्डे झाले जमीनदोस्‍त

Canacona Scrapyard Demolition: काणकोण पालिकेने आपल्‍या कार्यक्षेत्रातील अकरा बेकायदा भंगारअंड्ड्यांवर कारवाई करून ते जमीनदोस्‍त केले. त्‍यामुळे नागरिकांनी समाधान व्‍यक्त केले आहे.
Published on

Canacona Scrapyard Demolition

काणकोण: काणकोण पालिकेने आपल्‍या कार्यक्षेत्रातील अकरा बेकायदा भंगारअंड्ड्यांवर कारवाई करून ते जमीनदोस्‍त केले. त्‍यामुळे नागरिकांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

काणकोण पालिकेला हे भंगारअड्डे हटविण्यास अपयश आल्याने मास्तीमळ प्रभागाचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी उपोषण करण्याचा इशारा तीन महिन्यांपूर्वी दिला होता. त्‍यानंतर पालिका बैठकीत ठराव घेऊनही कारवाई एकदम संथगतीने सुरू होती. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असा प्रकार सुरू होता.

Canacona Scrapyard Demolition
Goa Education: डीएड अभ्यासक्रम बंद होणार! शिक्षण विभागाने सांगितले 'हे' कारण; राज्य घेणार 'एनसीईआरटी’चे मार्गदर्शन

काणकोणात डेंग्यू व मलेरियाचा फैलाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तरी हे भंगारअड्डे हटविणे गरजेचे होते. लोकांच्‍या आक्रमक भूमिकेमुळे पालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी या भंगारअड्डयांच्या मालकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र प्रत्यक्षात कारवाई काहीच झाली नव्‍हती. आता उशिरा का होईना, कारवाई झाल्‍यामुळे नागरिकांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com