Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa Marathi Schools News: आम्ही मराठी शाळा देखील बंद केल्या नाहीत. तर, त्यांची दुरुस्ती, नुतणीकरण किंवा नव्याने बांधल्यात, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: "सरकारी प्राथमिक मराठी शाळा सरकारने बंद केल्‍या नाहीत. पालकांनी आपल्‍या पाल्‍यांना शहरांतील अनुदानित शाळांमध्‍ये पाठवण्‍यास सुरुवात केल्‍यामुळेच या शाळा बंद पडल्‍या. कमी विद्यार्थी संख्‍या असलेल्‍या शाळांचे विलिनीकरण करण्‍यावर सरकारचा भर आहे," असे राज्याचे शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

मूल्यवर्धन ३.० या ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री सावंत बोलत होते. "शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, पण अनेकवेळा पालक मुलांना शहरात पाठवतात आणि शाळा बंद कराव्या लागतात. आम्ही शाळा विलिनीकरण करण्यावर भर दिला आहे पण, बंद केल्या नाहीत. आम्ही मराठी शाळा देखील बंद केल्या नाहीत. तर, त्यांची दुरुस्ती, नुतणीकरण किंवा नव्याने बांधल्यात," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल होते त्यावेळी वाईट वाटते, असे सावंत अलिकडे वाढलेल्या घटनांना उद्देशून बोलताना म्हणाले. अशा वेळी शिक्षकांनी मूल्यवर्धन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे आणि त्यांची क्रिएटीव्हीटी ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना दिला. विद्यार्थ्यांना मारहाण करणे देखील चुकीचे असल्याचे सावंतांनी यावेळी नमूद केले.

शाळांमध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन देखील सावंत यांनी यावेळी केले. दररोज योगाभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक फायदा होईल. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष देण्याची क्षमता देखील वाढते. सकाळच्या शाळेतील प्रार्थनेत योगाभ्यास शिकवला जाऊ शकतो, असे सावंत यांनी यावेळी सूचवले.

शिक्षण क्षेत्रात बदलाचा भाग म्हणून अनेक शाळांमध्ये किमान एक अत्याधुनिक क्लासरुम निर्माण करण्यात आला आहे. उरलेल्या सर्व शाळांमध्ये अशा प्रकारे क्लासरुम तयार करण्याची आमची योजना आहे. येत्या काळात विविध डिजिटल टूल्स सादर करण्याचा आमचा विचार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT