CM Sawant, Kala Academy Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ‘आयटीआय’ना ‘आयएसओ’ मिळविणारे गोवा पहिले राज्य

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील प्रत्येक व्यक्तीला जर काम हवे असेल तर त्यांनी कौशल्यपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी सरकार प्रयत्नरत असून मोठ्या प्रमाणात नवनवीन अभ्यासक्रम गोव्याच्या ‘आयटीआय’मध्ये सुरू केले जात आहेत. नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय केल्यास अधिक कमाई करता येते, त्यामुळे राज्यातील प्रत्येक घरात एक व्यावसायिक निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ते कला अकादमी येथे आयोजित ‘जागतिक कौशल्य दिन’ कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, टाटा टेक्नॉलॉजीचे प्रशांत हरिकुंड, ताज हॉटेलचे रणजीत फिलिपोज, गौरीश धोंड, संचालक एस.एस. गावकर, विजय सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आता राज्यातील आयटीआयचे चित्र बदलेले आहे. सर्व आयटीआयमध्ये शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांना शंभर टक्के नोकऱ्या मिळत आहेत. राज्यातील सर्व आयटीआय तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय हे ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.

गोव्यातील केवळ पाच टक्के नागरिक हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कामासाठी येतात. आम्हाला स्थानिक इच्छुक उमेदवार हवे आहेत. पुढील पाच वर्षांत या क्षेत्रात २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. ‘ताज’ने आयटीआयशी सामंजस्य करार केल्याने ६ महिने अभ्यासक्रम आणि ६ महिने प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आम्ही कुडचडे आणि डिचोलीतील आयटीआयमध्ये सोलर टेक्निकल कोर्स सुरू केला असून त्याचाही लाभ करून घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

अनेक युवक उच्च शिक्षण घेतात आणि आपल्याला कोणतीही नोकरी द्या म्हणून सांगतात. जर तुम्ही एखादे कौशल्य आत्मसात केले तर नोकरीपेक्षा अधिक कमाई करू शकता. स्वतःचा व्यवसाय उभारून इतरांना रोजगार देऊ शकता. यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते. केवळ सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार या मानसिकतेतून युवकांनी बाहेर पडावे, अशी माहिती राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

थोडक्यात महत्त्वाचे

टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य सरकार मिळून आयटीआयमध्ये २२० कोटींची गुंतवणूक.

रोटरी क्लब फोंडा न्यू जनरेशनद्वारे मुख्यमंत्री कौशल्य पथ योजनेच्या लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान.

सेंटर ऑफ एक्सलन्स (हॉस्पिटॅलिटी) अभ्यासक्रम आयटीआय फर्मागुढी, डिचोली, साकोर्डा आणि म्हापसा येथे सुरवात.

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान.

राज्यातील सर्व आयटीआय आयएसओ प्रमाणित करणारे गोवा बनले पहिले राज्य.

टुरिझम ॲम्बॅसिडर अभ्यासक्रम सुरू करणार.

प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जागतिक कौशल्य दिन’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने कला अकादमी येथे राज्यातील आयटीआय विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच इतर नागरिकांद्वारे आणलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे प्रदर्शन १५ जुलैपर्यंत सुरू असून या प्रदर्शनाला राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी, असे परिपत्रकही शिक्षण संचालनालयाद्वारे जारी केले आहे.

‘ॲप्रेन्टिसशीप’चे नूतनीकरण नाही

राज्यात मुख्यमंत्री ॲप्रेन्टिसशीप योजनेद्वारे अनेक युवकांना प्रथम रोजगाराची संधी देण्यात आली आहे. मात्र, काहींचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने पुन्हा नव्याने नूतनीकरण करण्यास सांगत आहेत; परंतु तसे करता येणार नाही. ‘ॲप्रेन्टिसशीप’ हा युवकांना कामाचा अनुभव मिळावा यासाठीचा उपक्रम आहे. ॲप्रेन्टिसशीपच्या माध्यमातून काम केल्याचे प्रमाणपत्र मिळेल जे सरकारी तसेच खासगी काम मिळविण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र म्हणून वापरता येईल. येत्या काळात नव्या युवकांना संधी देण्याचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात अनेक परदेशी पर्यटक येतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईडची गरज असते. अनेकांना इंग्रजी समजत नाही त्यामुळे टुरिझम ॲम्बॅसिडर कोर्स सुरू करणार आहोत. ज्याअंतर्गत रशियन, फ्रेंच आणि जर्मन भाषांचे ज्ञान देण्यात येईल, जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना ते मार्गदर्शन करू शकतील. परराज्यातून आलेल्या गाईडपेक्षा स्थानिकांनी जर ज्ञान घेतले तर अधिक चांगले होईल.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT