Farmagudi ITI: फर्मागुढी-आयटीआयमध्ये वनखात्यातर्फे वनमहोत्सव

Ponda News: गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनितकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
Ponda News: गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनितकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
Farmagudi Iti Van MahotsavDainik Gomantak

फर्मागुढी - फोंड्यात आयटीआय संकुलात आज (शुक्रवारी) वन खाते सामाजिक वनिकरणाच्या उपक्रमांतर्गत आयटीआय प्रशासनाच्या सहकार्याने वनमहोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनितकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इतर मान्यवरांत वन खात्याचे सर्व अधिकारी, आयटीआयचे अधिकारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुनितकुमार गोयल यांच्या व इतरांच्या हस्ते यावेळी रोपट्यांचे रोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनाही यावेळी झाडांचे वितरण करण्यात आले.

Ponda News: गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनितकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
Farmagudi Fort | फर्मागुडी किल्ल्याकडे सरकारच्या दुर्लक्षामुळे शिवभक्त संतापले | Gomantak Tv

पुनितकुमार गोयल यांनी पर्यावरण रक्षणासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांची आवश्‍यकता असल्याचे नमूद केले. वन खात्यातर्फे एक स्तुत्य उपक्रम आखल्याबद्दल त्यांनी गौरवोद्‍गार काढले आणि एक झाड आपल्या आईच्या नावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पाठिंबा द्या, असे आवाहन केले.

वन खात्याचे उपवनसंरक्षक विशाल सुर्वे यांनी झाडांचे संगोपन करणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने पालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com