Costa Deliziosa Dainik Gomantak
गोवा

Mormugao : मुरगाव बंदरावर इटालियन लक्झरी प्रवासी क्रूझ दाखल

1500 प्रवाशांना घेवून एम. एस. कोस्टा डेलिझिओसा जहाज दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao : मुरगाव बंदरात कोस्टा डेलिझिओसा 1 हे पर्यटक जहाज 2419 विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले. 2022-23 या पर्यटन हंगामातील विदेशी पर्यटक जहाज कोस्टा डेलिझिओसा 1 आज मुरगाव बंदरात सकाळी 8:30 वाजता 1545 प्रवासी व 844 कर्मचारी मिळून 2419 विदेशी पर्यटकांना होऊन दाखल झाले.

सदर जहाज मुंबई मार्गे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले. आयएसएस शिपिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रायोजनाखाली सदर जहाज सकळी 8.30 वाजता मुरगाव बंदरात दाखल झाले.

नंतर पर्यटकांनी सर्व सोपस्कर पुर्ण करून गोवा भ्रमंतीसाठी रवाना झाले. गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आस्वाद घेतल्यानंतर पर्यटक पुन्हा मुरगाव बंदरात दाखल होऊन जहाजात रवाना झाले. नंतर सदर जहाज मालदिवजला संध्याकाळी साडेसात वाजता रवाना झाले.

मुरगाव बंदरातील पर्यटक क्रुज जेटीवर देशी - विदेशी पर्यटक जहाजे पर्यटकांना घेऊन गोवा भ्रमंतीसाठी येतात. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ' ओसिएन' ओडीशी जहाजातील पर्यटकांनी गोवा भ्रमंतीसाठी पर्यटक बस मधून जाण्याचे ठरविले. मात्र यावेळी बस व्यावसायिक व टॅक्सी व्यावसायिकांंमध्ये वाद झाला व याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागला होता.

या घटनेनंतर वास्को हार्बर क्रुज जेटीवर देशी पर्यटकांना घेऊन जहाज दाखल झाले होते. यावेळी गैर प्रकार घडू नये, यासाठी मुरगाव पोलिस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने मोठा बंदोबस्त लावला होता. त्यानंतर बुधवारी एम. एस. कोस्टा डेलिझिओसा जहाज मुरगाव बंदरावर दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT