Union Budget 2023: केंद्राकडून गोव्याची निराशा; विजय सरदेसाईंची अर्थसंकल्पावर सडकून टिका

2023 -24 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला
Vijai Sardesai Reaction On Union Budget 2023
Vijai Sardesai Reaction On Union Budget 2023Dainik Gomantak

Vijai Sardesai Reaction On Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प मांडला. मोदी सरकारने त्यांचा दुसरा अखेरचा आणि 2023 -24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सीतारमण यांनी 2023 -24 चा अर्थसंकल्प 83 मिनिटात मांडला. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदांनी निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान या अर्थसंकल्पावर विवीध नेत्यांच्या तसेच आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "डबल इंजिन सरकारने या अर्थसंकल्पात गोव्याची निराशा केली आहे. सरकार गोवावासीयांना दिलासा देण्यात अपयशी ठरले" अशी टिका सरदेसाई यांनी सरकारवर केली.

Vijai Sardesai Reaction On Union Budget 2023
Union Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पात 'या' गोष्टींवर भर... अर्थमंत्र्यांच्या सर्व घोषणा वाचा एका क्लिकवर

अर्थसंकल्पात मिष्टी योजनेची घोषणा करण्यात आली. समुद्राला लागून असलेल्या किनारी भागातील खारफुटीचे जतन करण्यासाठी मिष्टी योजना आणली जात आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण होणार आहे.

मिष्टी या शब्दाचा अर्थ बंगाली भाषेत गोड आहे. मिष्टी योजनेसाठी कॅम्पा फंड चा वापर करण्यात येणार आहे. मात्र गोव्याचा पैसा मध्य प्रदेशमध्ये वनीकरणासाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे बजेटमध्ये गोव्याला काहीच मिळाले नाही आहे.

Vijai Sardesai Reaction On Union Budget 2023
Yoga: 'सूर्याची उपासना ही आपली परंपरा असून योगात कल्याणाची भावना'

कोळसा वाहतुकीसाठी गोव्याच्या जंगलातील झाडे कापण्याचा घाट का घातला जातोय? डबल ट्रॅकिंगसाठी समुद्री मार्गाचा वापर करावा.

50 जागा टुरिझम डेस्टिनेशन म्हणून निश्चित करुन त्यांचे प्रमोशन केले जाणार आहे. या 50 साईट्स मध्ये गोव्यातील 10 तरी साईट्स प्रमोद सावंत निश्चित करु शकतात का? की म्हादई सारखे हे पण हातातून जाऊ देणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

म्हादई प्रश्नी गोव्यातील सरकारचे केंद्राला काहीच पडले नाही आहे असे या अर्थसंकल्पातून दिसून येते असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com