It will rain heavily in Goa this year Dainik Gomantak
गोवा

'यंदा गोव्यात मॉन्‍सून जोरदार बरसणार'

डॉ. रमेश कुमार: बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाची शक्‍यता

दैनिक गोमन्तक

पणजी: मॉन्‍सूनपूर्व काळात मे महिन्‍यात चक्रीवादळ निर्माण होण्याची मोठी शक्‍यता असते. गोव्‍यात मे महिन्‍यात मॉन्‍सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. यावर्षी पाऊस चांगला होईल, याचे हे संकेत आहेत, अशी माहिती हवामानशास्‍त्रज्ञ तथा एनआयओचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी दिली.

मे महिन्‍यात मॉन्‍सूनपूर्व चक्रीवादळाची स्‍थिती निर्माण होत असते. ही स्‍थिती केरळमध्ये मॉन्‍सून वेळेत दाखल होईल, असे संकेत देते. बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणे,तो पुढे सरकणे, ही चांगली बाब असल्‍याचे ते म्हणाले.

पारा घटणार: येत्या काही दिवसांत राज्‍यात तापमानाचा पारा किंचितसा घटण्याची शक्यता आहे. शनिवारी पणजी वेधशाळेच्‍या मुरगाव केंद्रात 34 अंश सेल्‍सियस तापमानाची नोंद झाली. रविवारी यात किचिंतशी घट होऊन ते 33 अंश डिग्री सेल्‍सियस इतके असेल, असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे.

किनारी भागात सतर्कतेचा इशारा

उत्तर भारतात सध्या उष्णतेचा तीव्र चटका जाणवत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. देशात उष्णतेची लाट सुरू असताना, आग्नेय बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही तासांत या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा गोव्‍याला धोका नाही. तरीही किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT