Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : शैक्षणिक दर्जा उंचावण्‍यासाठी कृतियोजना आखणे गरजेचे

देशभरातील प्राचार्यांना आवाहन; राष्‍ट्रीय परिषदेचा समारोप

दैनिक गोमन्तक

देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात येणार असून देशभरातील प्राचार्य त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा हेतू साध्य करण्यासाठी प्राचार्यांनी एक कृतियोजना आखावी, असे आवाहन मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी केले.

मनोरा-राय येथील व्ही. एम. साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशनच्या सभागृहात आयोजित राष्ट्रभरातील महाविद्यालयीन प्राचार्यांच्या परिषदेच्या समारोप सोहळ्यात कामत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्यासमवेत उद्योगपती व धेंपे शैक्षणिक संस्थेचे अध्‍यक्ष श्रीनिवास धेंपे उपस्थित होते.

गोवा विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. एस. नाडकर्णी यांनी स्पष्ट केले की, २०२३-२४ शौक्षणिक वर्षापासून विद्यापीठातर्फे नवीन धोरण अंमलात आणले जाईल. या धोरणामुळे देशाच्या शैक्षणिक क्षेत्राला नवीन आयाम मिळेल.

गोव्‍याची क्षमता एक आदर्श केंद्र बनण्‍याची

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा गोवा एक आदर्श केंद्र बनू शकेल. गोवा हे लहान राज्य आहे व येथे काही प्रमाणात साधनसुविधाही उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यासाठी गोव्याला कठीण जाणार नाही, असे दिगंबर कामत म्‍हणाले. देशाच्या मागील शैक्षणिक धोरणातून अनुभव घेऊनच व संशोधकांनी त्यावर खोलवर विचारविनिमय करून हे धोरण तयार केले आहे. त्‍यात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना, कौशल्याला वाव मिळणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी करताना देशाच्या शैक्षणिक क्षेत्राला उज्‍ज्वल भवितव्य आहे. या धोरणात आव्हानेही कमीच आहेत. एक प्रामाणिक, दमदार व उत्कट नागरिक बनविणे ही काळाची गरज आहे व हे धोरण त्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

- श्रीनिवास धेंपे, धेंपे शैक्षणिक संस्थेचे अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT