ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: ‘एसटी’ समाज चळवळीत उभी फूट

हौतात्म्य दिन : उद्याच्‍या सरकारी कार्यक्रमावर सभापतींचा बहिष्कार : गोविंद गावडे, प्रकाश वेळीप यांची वेगळी चूल

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation राज्यात राजकीयदृष्ट्या वंचित असलेल्या एसटी समाजाला न्याय मिळावा, यासाठी बाळ्ळी येथे केलेल्या आंदोलनात मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप या तरुणांनी जीवाची आहुती दिली, त्यांची पुण्यतिथी अवघ्या दोन दिवसांवर (२५ मे) आली असताना राज्यातील एसटी नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातून एसटी समाजातील फूट उघड झाली आहे.

सध्या गोव्यात एसटी समाज तीन ठिकाणी विभागला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती रमेश तवडकर यांचा गट एका बाजूने, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि माजी मंत्री प्रकाश वेळीप यांचा गट एकमेकांवर कुरघोडी करू पाहत आहे.

तर ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ या नावाचा तिसरा गट या राजकीय चढाओढीत सामील झाला आहे. त्यामुळे या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.

तीन संघटनांचे तीन ठिकाणी कार्यक्रम

यात सरकारचे राजकारण आहे का, असे तवडकर यांना विचारले असता, राजकारण सरकार करत नाही, तर काही व्यक्ती करतात असे म्हणत त्यांनी नाव न घेता गावडे आणि वेळीप यांच्यावर निशाणा साधला. जो कार्यक्रम सरकार साजरा करत आहे, त्यात भाजपचे किती लोक आहेत याचा शोध घ्यावा, असे ते म्हणाले.

दरम्यान, आज मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन या संघटनेचे अध्यक्ष ॲड. जुवांव फर्नांडिस यांनी गावकर आणि वेळीप यांच्या बलिदानाच्या जोरावर जे आज सरकारात आहेत, त्यांनीच आज ‘एसटीं’च्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे, असे म्हणत तवडकर आणि गावडे यांच्यावर निशाणा साधला.

मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनची वेगळी चूल : त्यांच्या या हौतात्म्याची आठवण ठेवण्यासाठी 25 मे रोजी मंत्री गोविंद गावडे आणि प्रकाश वेळीप यांनी सरकारी माध्यमातून ‘प्रेरणा दिवस’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मात्र, या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सभापती रमेश तवडकर यांनी घेत काणकोण येथे ‘संकल्प दिवस’ हा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तर मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन या संघटनेने मडगाव येथील लोहिया मैदानावर वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

प्रेरणा दिन कार्यक्रमावर माझा तात्त्विक बहिष्कार : रमेश तवडकर

‘उटा’ संघटनेच्या मागण्यांसाठी शहीद झालेल्या मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जाणारा संकल्प दिन कार्यक्रम आम्ही आयोजित करत आलो आहोत.

त्यामुळे इतर संघटना आणि सरकारच्या वतीने नियोजित प्रेरणा दिन कार्यक्रमावर माझा तात्त्विक बहिष्कार असेल. मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सभापती रमेश तवडकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणे केली.

सभापती तवडकर म्हणाले की, ज्यावेळी आंदोलन झाले, त्यावेळी मनोहर पर्रीकर यांच्या सूचनेनुसार संकल्प दिन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते आणि आम्ही आजपर्यंत तो पाळत आहोत. जी पक्षाची भूमिका असेल, तीच आमची आहे.

आता काही लोक वेगळी भूमिका घेऊन कार्यरत आहेत. त्यांच्याबद्दल मला कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. मात्र, शहीद मंगेश गावकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही स्वीकारली असून त्याची बहीण आणि भावाला नोकरी देण्याबरोबरच त्यांना सतत मदत करत आहोत. दिलीप वेळीप यांच्याबाबतीतही तेच आहे

‘उटा’शी काहीही संबंध नाही : तवडकर

2017 नंतर मी राजकारणाबाहेर गेल्याने मूळ कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले. मूळ संकल्पना बाजूला केली आणि प्रेरणा दिनाची संकल्पना राबवली. आमची तात्त्विक भूमिका असल्याने माझा त्या कार्यक्रमावर बहिष्कार असेल.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जरी हजर राहणार असले तरी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार नाही. माझा ‘उटा’ संघटनेशी काहीही संबंध नाही, असेही तवडकर यांनी सांगितले. त्यामुळे एसटी समाजाच्या चळवळीत फूट गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

Shappora River Water: शापोरा नदीचे पाणी आता थेट अस्नोड्यापर्यंत! साळ बंधाऱ्याचा अखेरचा दरवाजा बंद; दररोज २५ कोटी लिटर पाणी उचलणार

SCROLL FOR NEXT