Vishwajit Rane|Goa News
Vishwajit Rane|Goa News Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : अधिवेशनाआधी दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन; मंत्री विश्वजीत राणेंची माहिती

Rajat Sawant

नगर नियोजन खात्यामार्फत TCP कायद्याच्या कलम 17(2) अंतर्गत सर्व प्रकरणांची छाननी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट केली आहे.

मागील समितीने मनमानी पद्धतीने घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करण्याचे समितीला आदेश दिले आहेत. सर्व बेकायदेशीर गोष्टी दुरुस्त केल्या जातील. तसेच निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी या तज्ञांसह एक चौकशी समिती स्थापन केली जात आहे अशीही माहिती मंत्री राणे यांनी दिली.

तज्ज्ञ समितीमध्ये पर्यावरण मूल्यमापन समितीचे अध्यक्ष, पर्यावरण शिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, अभियंते, कायदेतज्ज्ञ, GCCI चे अध्यक्ष आणि गोवा सरकारचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

ही तज्ज्ञ समिती TCP विभागाच्या कामकाजात संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करेल. तसेच TCP विभागाला मदत व सहकार्याने काम करेल. नगरनियोजन मंत्री या नात्याने गोंयकाराला न्याय मिळवून देणार. येत्या तीन महिन्यांत हा अहवाल सार्वजनिक केला जाईल. याबाबतचा सविस्तर अहवाल विधानसभेत मांडण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील विधानसभा अधिवेशनापूर्वी निलंबित करण्यात येईल असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT