Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Politics: दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पाटकर-पालेकरांची लागणार कसोटी

Goa Politics: लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम आदमी पक्ष आता काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे पक्षाचे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी शनिवारी​ सांगितले.

त्यामुळे खऱ्या अर्थाने आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि ॲड. अमित पालेकर यांची या दोन्ही जागा जिंकून आणण्यासाठी कसोटी लागणार आहे.

करंझाळे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते. पालेकर म्हणाले की, आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘आप’ने काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, गोवा फॉरवर्ड, मगोप या प्रादेशिक पक्षांसह तिन्ही अपक्ष आमदारांनीही ‘इंडिया’ आघाडीमध्ये सहभागी​ होणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.

‘आरजी’चे पितळ उघड'

भाजपला हरविण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा ‘आरजी’च्या अध्यक्षांनी केला होता. आम्ही त्यांना आघाडीत येण्याचे आमंत्रण दिले होते; परंतु त्यांनी आम्हाला टाळले, असे पालेकर म्हणाले

भ्रष्ट ‘कमळ' उखडून टाकू

राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीसाठी कॉंग्रेस आणि ‘आप’ने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, आमदार, बुथ व्यवस्थापन, कार्यकर्त्यांना काँग्रेसबरोबर एकत्रितरित्या काम करावे लागेल,

असे सांगितले आहे. पालेकर व पाटकर यांनी पत्रकार परिषदेत ‘गोयंकार हातात झाडू घेऊन भ्रष्ट कमळ उखडून टाकणार असल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT