Goa Mining
Goa Mining Dainik Gomantak
गोवा

राजकीय पक्षांचा खाणबंदीच्या मुद्द्यावर काढता पाय!

दैनिक गोमन्तक

साखळी: निवडणुकीस सामोरा जाणारा उत्तर गोव्यातील खाणपट्टा उर्वरित गोव्याप्रमाणेच विविध पक्षांविषयीच्या निष्ठा राखून असल्यामुळे खाणबंदीचा मुद्दा निवडणुकीच्या ऐरणीवर येताना दिसत नाही. एकंदर नूर पाहता या भागाचा कौल नेहमीपेक्षा वेगळा असणार नाही.मात्र,खाणबंदीच्या मुद्याला सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात न आणता सोयीस्कर बगल दिल्याचे एकंदर खाणपट्ट्यातील चित्र आहे.(issue of Goa Mining ban has been ignored by political parties)

मये, डिचोली, साखळी, पर्ये व काही प्रमाणात वाळपई हे मतदारसंघ खाणपट्ट्यात येतात. यापैकी साखळीतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) भाजपचे उमेदवार आहेत. सत्तरीतील दोन्ही मतदारसंघांवर असलेला विश्वजीत राणे यांचा वरचष्मा त्यांचे विरोधकही खासगीत मान्य करताना दिसतात. मये आणि डिचोलीत तुल्यबळ लढती अपेक्षित असल्या तरी कोणत्याच उमेदवाराने खाणबंदीवर त्यांच्याकडे काही पर्याय असल्यास तो जाहीरपणे मांडलेला नाही.

खाणबंदी असली तरी खाणींवरील ताबा कोणत्याच कंपनीने सोडलेला नाही. खाणींच्या प्रवेशदाराशी सुरक्षा रक्षकांचा अष्टोप्रहर पहारा असतो, आणि कंपनीचे अधिकारी देखभालीची कामे करत असतात. त्यामुळे भविष्यात कधीतरी खाणी सुरू होतीलच,अशा समजुतीत हा परिसर आहे.

येथील खाण (Goa Mining) कंपन्यानी नोकरकपात केली आहे, तरीही मोठ्या कंपन्यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवलेले आहे. टाकाऊ मालाच्या विक्रीला जरी परवानगी मिळाली तरी खाणपट्टा पुढील दहा वर्षे व्यग्र राहील. त्या दिशेने सरकारचे यत्न चालल्याचे पाळीचे दत्ताराम गावस यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.

नावेली येथील एक ट्रकमालकानेही असाच विश्वास व्यक्त केला. होंडा येथील सुरज कवळेकर या महाविद्यालयीन युवकाने खाणी लवकर सुरू व्हाव्यात, अशी मागणी करून लिलावाद्वारेच त्या सुरू व्हायला हव्यात, अशी प्रतिक्रियाही दिली.

महादेव खांडेकर यांनी गेल्याच आठवड्यात कॉंग्रेसमधून मगो (Goa MGP) पक्षात प्रवेश केला. या मतदारसंघाचे चित्र पाहता एक कॉंग्रेसचे धर्मेश सागलानी सोडल्यास मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याची क्षमता अन्य उमेदवारांत नसल्याचे जाणवते. काही खाणचालक मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत त्या नाराजीचे प्रतिबिंब उमटलेले नाही. खाणपट्ट्यातील नाराजीचा मुद्दा ऐरणीवर येऊ नये, अशाच दृष्टीने प्रचार चालल्याचेही दिसते. इथला मतदारही सरकारी नोकऱ्या आणि अन्य प्रश्नांवर तितक्याच तीव्रतेने बोलताना दिसतो.

मये मतदारसंघातली चर्चाही खाणप्रश्नावर क्वचितच स्थिरावताना आढळली. खाणीमुळे अवघ्याच काहीजणांची चांदी झाली, इतरांना धूळ खावी लागली, अशी तीव्र प्रतिक्रिया सुरज कवठणकर याने दिली. येथेही निवडणुकीनंतर खाणी सुरू होतील, असा विश्वास व्यक्त करणारे आढळले.

पुती गावकर यांचे मौनही बोलके !

खाणंबदीमुळे उदरभरणापासून वंचित झालेला एक अल्पसंख्य घटक या भागात असला तरी गेल्या पाच वर्षात अनेकांनी पर्यायी रोजगाराची वाट धरल्याचे दिसते. साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊ पाहंणारे कामगार नेते पुती गावकर यांना येथे त्यांच्या आम आदमी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. पुती यांचे मौनही बोलके आहे. येथे तृणमूल कॉंग्रेसनेही उमेदवार दिलेला नाही, तर मगोपने मागच्या वेळचे आपले उमेदवार व पाळीचे माजी सरपंच महेश गावस यांना डावलून निवडणुकीच्या रिंगणात नवख्या असेलल्या महादेव खांडेकर यांना उतरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

SCROLL FOR NEXT