ISRO Chief S. Somnath to Speak On Chandrayaan in Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: 'इस्रो'चे प्रमुख एस. सोमनाथ गोवा विद्यापीठात येणार; चांद्रयान-3, आदित्य एल-1 मोहिमांचा उलगडणार पट

शालेय विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश

Akshay Nirmale

ISRO Chief S. Somnath to Speak On Chandrayaan in Goa University: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने नुकतेच चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड करून इतिहास घडवला. भारत चंद्रावर यान उतरवणारा अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरला.

या मोहिमे पाठिमागे ज्यांचा ब्रेन कार्यरत होता, ते इस्रो या संस्थेचे सध्याचे प्रमुख एस. सोमनाथ आता गोवा विद्यापीठात येणार आहे. ते भारताची चांद्रयान-3 मोहिम तसेच सूर्याच्या अभ्यासासाठी असलेली आदित्य एल 1 या मोहिमेचाही सर्व पट ते उलगडणार आहेत.

चांद्रयान 3 आणि आदित्य-एल 1 या मोहिमांच्या यशानंतर या मोहिमांमध्ये सहभागी असलेले शास्त्रज्ञ लोकांशी संवाद साधणार आहेत.

26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत या दोन्ही मोहिमांचे प्रकल्प संचालक आणि या मोहिमांमध्ये सहभागी असलेले प्रमुख शास्त्रज्ञ व्याख्याने देतील आणि स्थानिक संशोधक तसेच महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

त्याचाच एक भाग म्हणून इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गोवा विद्यापीठात येणार आहेत. इस्रोने गोवा विद्यापीठात (GU) द्वैवार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सहमती दर्शविली आहे. या कार्यक्रमात एस. सोमनाथ यांचे चांद्रयान-3 आणि आदित्य-L1 वर भाषण होणार आहे.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये 22 व्या राष्ट्रीय अंतराळ विज्ञान परिसंवादाच्या उद्घाटनात प्रमुख पाहूणे म्हणून एस. सोमनाथ भाषण करतील.

सर्व सहा सत्रांत मिळून इस्रोचे एकूण 50 ते 60 ज्येष्ठ मान्यवर व्याख्याने देणार आहेत. त्यातील काही व्याख्याने लाईव्ह दाखवली जातील. काही कार्यक्रम दक्षिण गोव्यातही होणार आहेत, असे कुलगुरू हरिलाल बी. मेनन यांनी सांगितले आहे.

या व्याख्यानांना शालेय विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश असेल. परिसंवादाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक प्रदर्शनही भरवले जाईल. तिथेही विद्यार्थी इस्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधू शकतील.

या कार्यक्रमात संशोधक, संशोधन सहकारी, शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून नोंदणी करू शकतील आणि त्यांना शोधनिबंध सादर करता येतील. सुमारे 600 असे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी नोंदणी शुल्क रुपये 5000 इतके असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT