गोवा

ISL Football: एफसी गोवा टॉप, जमशेदपूर एफसीचा 1-0 फरकाने पराभव

जमशेदपूरविरुद्ध बदली खेळाडू व्हिक्टरचा निर्णायक गोल

किशोर पेटकर

ISL Football: बदली खेळाडू व्हिक्टर रॉड्रिगेझ याने आठ मिनिटे बाकी असताना नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दहाव्या मोसमातील अपराजित मालिका कायम राखली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी सोमवारी जमशेदपूर एफसीला १-० फरकाने हरविले.

सामन्याच्या ८२व्या मिनिटास उदांता सिंगच्या शानदार असिस्टवर स्पॅनिश व्हिक्टर रॉड्रिगेझचे हेडिंग अचूक ठरले. त्यानंतर ८५व्या मिनिटास सेईमिन्लेन डौंगेल याने जमशेदपूरसाठी बरोबरीचा गोल केला होता, परंतु ‘व्हीएआर’ने हा गोल अमान्य केल्यामुळे एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली.

एफसी गोवाचे आता सहा लढतीनंतर पाच विजय व एका बरोबरीमुळे १६ गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्सचेही तेवढेच गुण आहेत. मात्र मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची गोलसरासरी +७ अशी सरस असल्याने ते अव्वल स्थानी आले, तर +४ गोलसरासरीसह केरळचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला.

जमशेदपूरला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सात लढतीनंतर त्यांचे पाच गुण व दहावा क्रमांक कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT