Goa Assembly Election 2022 Dainik gomantak
गोवा

सासष्टीत कॉंग्रेसचे वर्चस्व धोक्यात

चर्चेला उधाण: 8 पैकी 5 मतदारसंघात पराभव

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोवा विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर झालेला निकाल पाहता एकवेळ सासष्टीतील मतदारसंघाच्या आधारे सरकार स्थापनेची भाषा करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे या तालुक्यातील वर्चस्व धोक्यात आले का?, हाच प्रश्र्न सर्वत्र चर्चिला जात आहे.

सासष्टी मतदारसंघात 8 मतदारसंघ सामावतात. यापूर्वी या सर्व मतदारसंघात कॉंग्रेसचेच उमेदवार निवडून यायचे पण या वेळी केवळ मडगाव, नुवे व कुंकळ्ळी वगळता इतर सर्व ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. दिंगबर कामतसुध्दा कॉंग्रेस म्हणून नव्हे तर स्वतःच्या वैयक्तिक क्षमतेवर आणि करिष्म्यावर निवडून आले आहेत.

नावेलीत भाजपचे उल्हास तुयेकर निवडून आले, तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. तुयेकर यायला पण नावेलीत भाजपच्या मतदार संख्येत वाढ झाली आहे, हे खरे असले तरी कॉंग्रेस, टीएमसी व आप उमेदवारांमध्ये मतविभागणी झाल्यामुळे तुयेकर निवडून आले,असे मत विष्लेशकांनी व्यक्त केले आहे.

वेळ्ळी/बाणावलीत ‘आप’

वेळ्ळी व बाणावलीत कॉंग्रेसच्या मतदारांनी पर्याय म्हणून आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिली. तर फातोर्ड्यात कॉंग्रेसने आपला उमेदवार न ठेवता गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईना पाठिंबा दिला. त्यामुळे विजय सरदेसाईंचा विजय जास्त सुकर झाला, असे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT