गोवा फॉरवर्ड चे गोव्यात ‘किंगमेकर’ चे स्वप्न तुटले

अंदाज फोल: धक्कादायक निकालाने गोवा फॉरवर्डही चिडीचूप
Goa Forward Party
Goa Forward Party Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेले कित्येक दिवस राज्यात सरकार स्थापनेसाठी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) व गोवा फॉरवर्ड या दोन्ही प्रादेशिक पक्षांना आजच्या निकालाने धक्काच दिला आहे. राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार नाही असे जनमत चाचणी दाखवल्याने या दोन्ही पक्षांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यांचा बेरंग झाला.

मगोने तृणमूल काँग्रेसशी युती करून 13 जागा लढविल्या होत्या. त्यांना 5-6 जागा जिंकण्याची आशा होती. त्यामुळे सरकार स्थापनेस त्यांची भूमिका महत्वाची ठरणार असे नेते सुदिन ढवळीकर यांना वाटत होते. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांनी गेले काही दिवस तशी भूमिकाही घेतली होती. पण आजच्या या निकालानेही ते सुद्धा आश्‍चर्यचकित झाले. गेल्या निवडणुकीत त्यांचे तीन आमदार निवडून आले होते. यंदा त्यांना 2 जागांवरच समाधान मानावे लागले.

Goa Forward Party
अखेर गोविंद गावडे यांच्यामुळे प्रियोळात पुन्हा कमळ फुलले !

गोवा फॉरवर्डला यावेळी मोठी मजल मारता आली नाही. मागच्यावेळी स्वबळावर त्यांचे चार उमेदवारांपैकी तिघेजण आमदार झाले होते. यावेळी 3 उमेदवारांपैकी एकच स्वतः विजय सरदेसाई हे निवडून आले. मये मतदारसंघातून त्यांचे उमेदवार संतोष कुमार निवडून येण्याची आशाही फोल ठरली. त्यांना काँग्रेसशी युती करूनही अपयश केली होती तरीही त्यांना यश आले नाही. त्यामुळे लोकांनी गोवा फॉरवर्ड या पक्षालाही स्वीकारले नाही. सरदेसाई हे फातोर्डा मतदारसंघातून त्यांच्या हिंमतीवर निवडून आले. यंदाच्या निकालामुळे मगोपसह अपक्ष उमेदवारांचा भाव कमी झाल्याचे दिसत आहे.

Goa Forward Party
'डिचोलीत भाजपचाच वरचष्मा'

तृणमूल काँग्रेस सपशेल अपयशी

गत निवडणुकीत खाते न उघडलेल्या आपने यंदा 2 जागा जिंकून विधानसभेत प्रवेश केला आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवलेल्या ‘रेव्होल्युशनरी गोवन्स’चा एक उमेदवार सांत आंद्रे मतदारसंघातून निवडून येत त्यांनीही खाते उघडले. मात्र मगोशी युती केलेल्या तृणमूल काँग्रेसने मते घेऊनही जागा जिंकता आली नाही. ‘आप’ व ‘आरजी’ या दोन्ही पक्षांनी चाळीसही मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर तसेच आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब हे दोन मतदारसंघातून उभे राहिले. त्यांनाही दारून पराभवाला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com