IRCTC Valentine Day Tour Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Tour Package: लव्ह का सीझन बनवा खास, 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरसोबत करा गोवा टूर; स्वस्त आणि मस्त पॅकेज

IRCTC Valentine Day Tour Package: IRCTC चे गोवा टूर पॅकेज 13 फेब्रुवारी 2025 पासून नागपूर येथून सुरू होणार आहे.

Pramod Yadav

IRCTC Tour Package

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी जायचा विचार तुम्ही करत असाल, तर IRCTC ने तुमच्यासाठी एक अतिशय खास पॅकेज आणले आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला गोव्याला भेट देण्याची संधी मिळत आहे. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य असून, देशातील सुंदर राज्यांमध्येही त्याची गणना होते.

गोव्यात मोठ्या संख्येने पर्यटक पार्टी करण्यासाठी येत असतात. गोवा हे केवळ पार्टी आणि मौजमजेचे ठिकाण नाही. येथे भेट देण्यासारखी अनेक अद्भुत ठिकाणे देखील आहेत. इथले पर्यावरण, निसर्गसौंदर्य, संस्कृतीच्या तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल.

येथील इतिहास, संस्कृती आणि जीवनशैलीवर पोर्तुगीज राजवटीचा मोठा प्रभाव आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही कुठेतरी जाण्याचा, फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे पॅकेज चुकवू नका.

पॅकेजचे नाव आणि ठिकाण (IRCTC Tour Package)

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे GOA VACATIONS EX NAGPUR. WBA016C हा या पॅकेजचा कोड आहे. IRCTC चे गोवा टूर पॅकेज 13 फेब्रुवारी 2025 पासून नागपूर येथून सुरू होणार आहे.

IRCTC चे हे फ्लाइट टूर पॅकेज आहे. यामध्ये तुम्हाला नागपूरहून गोव्याला विमानाने नेले जाईल. गोव्यात घेऊन जाण्यासाठी IRCTC कडून बस आणि कॅबचीही व्यवस्था केली जाईल.

पॅकेजमध्ये काय सुविधा मिळणार? (Facilities)

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधा मिळणार आहेत. पॅकेजचा एक भाग म्हणून, तुमच्या मुक्कामासाठी एक हॉटेल देखील IRCTC ने बुक केले आहे. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था देखील IRCTC कडून केली जाईल.

किती रुपये खर्च येणार? (Package Rate)

या पॅकेजद्वारे एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 30,100 रुपये खर्च करावे लागतील. दोन लोकांसोबत प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्तीला 26,150 रुपये खर्च येईल. जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करत असाल तर, तुम्हाला प्रति व्यक्ती 25,150 रुपये मोजावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT