IRCTC Goa Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Packages: दसऱ्यात गोव्याला येण्याचा प्लॅन करताय? मग आयआरसीटीचे हे खास पॅकेज पाहाच...

विविध पॅकेजिसमध्ये फ्लाईट, रेल्वे सेवेचाही समावेश

Akshay Nirmale

IRCTC Goa Packages: गोव्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबरपासून सुरू होतो. आणि त्याचवेळी गोव्यातील पर्यटन हंगामही सुरू होत असतो. आताही गोव्यातील पर्यटन हंगाम सुरू होऊन पंधरवडा लोटला आहे.

त्यामुळे विविध सरकारी, खासगी कंपन्यादेखील गोवा टुर पॅकेजिस जाहीर करत आहेत. रेल्वेच्या IRCTC कंपनीने यापुर्वीच गोवा टुरची अनेक पॅकेजिस जारी केली आहेत. त्यात आता आणखी एक नवीन पॅकेज IRCTC ने जाहीर केले आहे. (Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package)

काही दिवसांवर आलेल्या दसऱ्याच्या निमित्त IRCTC ने हे पॅकेज आणले आहे. यात शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी फ्लाइटने प्रवास करून मंगळवारी संध्याकाळी परत येऊ शकता.

IRCTC चे हे पॅकेज पाच दिवस आणि चार रात्रींचा स्टे देते. यात लखनौ ते गोवा फ्लाईट आहे. फ्लाईट, हॉटेल आणि लोकल ट्रान्सपोर्टसाठी प्रतीव्यक्ती ५१ हजार रूपये खर्च येईल.

दोन व्यक्ती असतील तर ४० हजार ५०० रूपये प्रतीव्यक्ती खर्च येईल. तीन व्यक्ती असतील तर ३८ हजार १५० रूपये प्रतीव्यक्ती खर्च येईल.

सरकारी कर्मचारी मुलांसह प्रवास करत असतील तर त्यांना एसटीसीचा लाभ मिळू शकतो. IRCTC च्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते.

IRCTC च्या आणखी एका गोवा पॅकेजमध्ये नागपूरहून ट्रेन आहे. चार दिवस आणि तीन रात्रींचे हे पॅकेज आहे. यात ट्रेन, हॉटेल आणि लोकल ट्रान्सपोर्टसाठी मिळून ३२ हजार ५०० रूपये प्रतीव्यक्तीसाठी खर्च येईल.

दोन व्यक्ती असतील तर २४ हजार ८०० रूपये तर तीन व्यक्ती असल्यास प्रत्यकी २४ हजार रूपये खर्च येईल.

गोव्यात मिरामार बीच, सायंकाळी मांडवी नदीवर क्रुझ राईड, उत्तर गोव्यातील बागा, कांदोळी, सिकेरी बीच, स्नो पार्क, ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस चर्च इत्यादी स्थळे दाखवली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT