Goa Restricted Water Supply: बार्देश तालुक्यातील अनेक भागात 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा खंडीत होणार आहे. कोलवाळमधील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे त्याचा परिणाम बार्देश तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे.
ज्या भागातील पाणीपुरवठा खंडीत होणार आहे किंवा जिथे कमी पाणीपुरवठा होणार आहे यात म्हापसा मतदारसंघाचाही समावेश आहे.
तसेच थिवीचा काही भाग, मोईरा येथील काही भाग, बस्तोडा, सोडे, मारना, वेर्ला कानकाचा काही भाग, आसगावचा काही भाग, कांदोळीचा काही भाग, कळंगुटचा काही भाग आणि पर्वरीच्या काही भागात या दिवशी पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही.
कोलवाळमधील फातिरवाडा (गवळीवाडा) येथील 1000mm च्या पाईलपलाईनला गळती लागल्याने या पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून बार्देश तालुक्यात कमी पाणीपुरवठा होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.