Goa Beach Shack: पर्यटन हंगामाला पंधरवडा उलटला तरी शॅक्सची उभारणी नाही; पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा

शॅक व्यावसायिकांची गैरसोय; पर्यटन विभागाकडून 359 शॅकचे वाटप
Goa Beach Shack:
Goa Beach Shack:Dainik 'Gomantak

Goa Beach Shack: गोव्यातील पर्यटन हंगामाला सुरवात होऊन आता पंधरवडा उलटून गेला आहे. पहिल्या चार्टर्ड फ्लाइटमधून रशियन पर्यटक देखील आले. तथापि, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील शॅकची उभारणी मात्र अजूनही झालेली नाही. पर्यावरण विभागाने अद्याप परवानगी न दिल्याने शॅक व्यावसायिकांची गैरसोय होत आहे.

बांबू, लाकडी खांब आणि पर्यावरणपूरक सामग्रीपासून बनविलेल्या बीच शॅक गोव्यात पर्यटकांना आकर्षित करून घेतात. देशी-विदेशी पर्यटकांमध्ये शॅक लोकप्रिय आहे.

शॅक्सना जागा देण्याचे काम पूर्वी पर्यटन विभाग करत होता. आता पर्यावरण विभाग करतो. पर्यटन विभागाने आधीच 359 बीच शॅकसाठी परवाने दिले आहेत, परंतु त्यांची उभारणी अद्याप झालेली नाही.

Goa Beach Shack:
Calangute: कर्नाटकच्या दोघा पर्यटकांना मारहाण करून लुटले; कळंगुटमधील प्रकार, तिघांना अटक

बीच शॅक धोरणानुसार पर्यटन विभाग वाटप प्रक्रियेसह तयार आहे. परंतु राज्याच्या पर्यावरण विभागाच्या सहभागामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. जो समुद्रकिनाऱ्याची जी क्षमता असते त्यानुसार शॅक्सचे स्थान पर्यावरण विभाग ठरवणार आहे.

पर्यावरण विभाग फक्त समुद्रकिनाऱ्यावरील क्षमतेसाठी जबाबदार असायला हवा होता आणि शॅकचे वाटप पर्यटन विभागाने करायला हवे होते, असे म्हटले जात आहे. शिवाय पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या जागा शॅक मालक स्वीकारत नसल्याचेही समोर येत आहे.

कळंगुटचे भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी बीच शॅक ऑपरेटर्ससह नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

Goa Beach Shack:
Goa Scholarship: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, पदवीस्तरावर शिष्यवृत्ती

शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्डोसो यांनी म्हटले आहे की, शॅक वाटपाबद्दल काही शंका आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया लांबली आहे.

सरकारने ठिकाणे बदलू नयेत, मागील हंगामात वाटप केलेल्या पूर्वीच्या जागांवर चिकटून राहावे. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांना पुन्हा भेटणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com