police  Dainik Gomantak
गोवा

वादग्रस्त पोलीस अधिकारी एकोस्कर यांच्या चौकशीत चालढकल सुरूच

राष्ट्रपती कार्यालयाकडून दखल : कारवाई संदर्भात मुख्य सचिवांना स्मरणपत्र

दैनिक गोमन्तक

मडगाव: वादग्रस्त पोलीस अधिकारी सागर एकोस्कर यांच्या विरोधात मडगाव येथील व्यावसायिक फ्लोयड कुतीन्हो यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रपती कार्यालयाने गोव्यातील मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. मात्र या संदर्भात पुढे काहीच न झाल्याने राष्ट्रपती कार्यालयातून मुख्य सचिवांना पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठविले गेले आहे. या प्रकरणी काय कारवाई केली त्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाला द्यावी अशी सूचना केली आहे.

(investigation into the controversial police officer Ekoskar continues)

राष्ट्रपती कार्यालयाच्या उपसचिव रुबिना चव्हाण यांनी हे पत्र पाठविले आहे. दरम्यान आपण केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश द्यावेत यासाठी कुटीन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयातही एक रिट याचिका दाखल केली आहे.

आपल्याला एका बनावट केसमध्ये गुंतवून एकोस्कर हे आपल्याकडून पैसे घेवु पाहत असल्याचा आरोप कुटीन्हो यांनी केला होता. कुटीन्हो हे सध्या इंग्लंडमध्ये असून या प्रकरणी तांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याने भारतात आल्यास त्यांना त्वरित अटक होऊ शकते. त्यामुळे ते इंग्लंडमध्येच अडकले आहेत.

राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात कुटीन्हो यांनी हे सर्व नमूद केले होते. त्यांनतर या प्रकरणी चौकशी करावी असा आदेश राष्ट्रपती कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिला होता.

दरम्यान या संबंधी पोलीस खात्याच्या दक्षता विभागाचे अधीक्षक बोसूएट सिल्वा यांनी राष्ट्रपती कार्यालयाला जो अहवाल पाठविला आहे त्यातही चुकीची माहिती देताना मडगाव पोलीस स्थानकात कुटीन्हो यांच्या विरोधात दाखल झालेल्या दोन फौजदारी गुन्ह्याच्या प्रकरणाची सुनावणी अजून न्यायालयात चालू असल्याचे नमूद केले आहे मडगाव पोलिसांनी कुटीन्हो याना पासपोर्ट क्लिअरन्स अहवाल दिला आहे त्यात या दोन्ही प्रकरणातून ते निर्दोष मुक्त झाल्याचे नमूद केले आहे. 'गोमंतक'ला ही कागदपत्रे उपलब्ध झालेली आहेत.

कुटीन्हो यांनी न्यायालयात जी रिट याचिका दाखल केली आहे, त्यातही अशी आणखी एक तफावत न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आहे. सध्या ज्या प्रकरणात कुतिन्हो यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी झाली आहे त्याच प्रकरणात शिवराम वायगणकर हे मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक होते त्यावेळी साक्षीदार म्हणून त्यांची जबानी नोंद केली होती. पण नंतर सागर एकोस्कर हे या पोलीस स्थानकाचे निरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळेस कुटीन्हो यांना त्याच प्रकरणात आरोपी करण्यात आले असे म्हटले आहे. या कथित छळ प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT