Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

अपयश लपविण्याचा डाव ; अधिवेशन दहा दिवसांत गुंडाळण्याचा आपचा जोरदार आरोप

भाजप सरकारने विधानसभेचे आगामी 25 दिवसांचे पावसाळी अधिवेशन 10 दिवसांतच गुंडाळण्याचे निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजप सरकारने विधानसभेचे आगामी 25 दिवसांचे पावसाळी अधिवेशन 10 दिवसांतच गुंडाळण्याचे निर्णय घेतला आहे. त्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकार स्वतःच्या शंभर दिवसांच्या कृती पुस्तिकेपासून दूर पळत असल्याचे सिद्ध होत असल्याची टीका टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

राज्यातील भाजप सरकार सर्व क्षेत्रात सपशेल अपयशी ठरले आहे. यामुळे घाबरलेल्या भाजप सरकारने आपले अपयश उघड होऊ नये म्हणून पंचायत निवडणुकांचे निमित्त सांगून विधानसभेचे आगामी 25 दिवसांचे पावसाळी अधिवेशन 10 दिवसांतच गुंडाळण्याचे निर्णय घेतले आहे, असे आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

व्हिएगस यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय विधानसभा कामकाज संबंधित नियमांचे उल्लंघन असून सार्वजनिक हिताच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी अपर्याप्त असल्याचे ते म्हणाले.

आपचे वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले, भाजप सरकार लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्यापासून दूर पळत आहे. सरकार अधिवेशन 10 दिवसांतच गुंडाळत असले तरी आम्ही गोमंतकीयांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न मांडणार आहोत.

अमित पालेकरांकडून कृती पुस्तिकेचा समाचार

आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी भाजप सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती पुस्तिकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, विधानसभेच्या अधिवेशनाचे दिवस कपात केल्याने हे दिसून येते की सरकार स्वतःच्या शंभर दिवसांच्या कृती पुस्तिकेपासून दूर पळत आहे. सरकारचे पोकळ दावे सर्वसामान्यांसमोर येऊ नये यासाठी भाजपाचा हा डावपेच आहे. हे सरकार पंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT