राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावात 31 दुरुस्त्या मांडल्या

कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्याकडून विविध आमदारांच्या प्रस्तावावर दुरुस्त्या
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकणाऱ्या आणि गोव्याच्या अस्मितेचे संरक्षण आणि जतन करण्यावर भर देणाऱ्या 31 दुरुस्त्या मांडल्या. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी मांडलेल्या आणि ताळगांवच्या आमदार जेनिफर मॉन्सेरात आणि नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर ही दुरुस्ती करण्यात आली आहे.

गोवा विधानसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाज नियमांच्या नियम 23 अन्वये कुंकळ्ळी आमदाराने केलेल्या दुरूस्त्यांत नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यात तसेच घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यात सरकारचे अपयश, पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यात आलेले अपयश याकडे लक्ष वेधले आहे. वन, वन्यजीव, गोव्याचा वारसा आणि ओळख, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचे संरक्षण आणि जतन करण्यात अपयश तसेच स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा आदर न राखणे, गोव्याची जीवनरेखा म्हादई नदीचे संरक्षण करण्यात आलेले अपयश, तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्यात आलेले अपयश, गोव्याचा कोळसा हब बनणे थांबवण्यात आलेले अपयश. प्रमुख बंदर प्राधिकरण कायदा नाकारण्यात आलेले अपयश आणि इतर विविध समस्यांवर लक्ष ओढले आहे.

राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि गुन्ह्यांचा शोध आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आलेले अपयश, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यात आणि एकूणच महागाई कमी करण्यात सरकारचे अपयश आणि सुशिक्षित तरुणांना भ्रष्टाचार मुक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश या दुरुस्त्यांत अधोरेखित करण्यात आले आहे.

Yuri Alemao
मुसळधार पावसाने कुशावतीला पुन्हा पूर

खाजगी क्षेत्रात गोव्यासाठी 80 टक्के नोकऱ्या आरक्षित करण्यात सरकारचे अपयश, राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनातील अपयश, राज्यात खाणकाम सुरू करण्यात आलेले अपयश, कोविड महामारी हाताळण्यात अपयश आणि पुरेशा आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आणि चांगल्या आरोग्य सेवा प्रदान करण्यात आलेले अपयश तसेच इतर काही प्रमुख समस्या युरी आलेमावकडुन मांडण्यात आल्या आहेत.

आमदार युरी आलेमाव यांनी दुर्लक्षित क्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांचे आर्थिक पुनरुज्जीवन पॅकेज जाहीर करण्यात सरकारचे अपयश आणि सामाजिक कल्याण लाभार्थी आणि अपंग व्यक्तींना वेळेवर सहाय्य प्रदान करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे दुरूस्ती प्रस्तावात म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरण आणि जमीन बळकावणे, पर्यटन उद्योग आणि प्रदूषणमुक्त औद्योगिक क्षेत्राला पाठिंबा आणि प्रोत्साहन न देणे, खेळांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण न करणे आणि राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात अपयशी ठरणे यावरही या दुरूस्त्यांचा भर आहे. कला आणि संस्कृती उपक्रमांसाठी पायाभूत सुविधांची देखभाल आणि निर्मिती करण्यात अपयश आणि कलाकारांना समर्थन आणि प्रोत्साहन देण्यात अयशस्वी होण्यावरही दाखल करण्यात आलेल्या दुरूस्त्यांमध्ये भर देण्यात आला आहे.

युरी आलेमाव यांनी कॅसिनो धोरणाची अंमलबजावणी करण्यात सरकारचे अपयश आणि गेमिंग कमिशनर प्रभावशाली करण्यात आलेले अपयश हे मुद्देही उपस्थित केले आहेत. त्यांनी मांडवी नदीतून ऑफशोअर कॅसिनो स्थलांतरित करण्याबाबत सरकारची उदासीनताही मांडली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यास आणि अनुसूचित जमातींना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आरक्षण देण्यास सरकारच्या अपयशाच्या मोठ्या मुद्द्यांचाही 31 दुरूस्त्यांमध्ये समावेश आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आलेल्या अपयशाकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सासष्टी तालुक्यातील सखल भागांतून जाणारा पश्चिम बगल रस्ता कमानीवर बांधण्यात सरकारच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करून, मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजात सातत्य राखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा कुंकळ्ळीच्या आमदाराने अधोरेखित केला आहे.

कृषी आणि फलोत्पादन क्षेत्राला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यात आणि शेतकऱ्यांना सहाय्य प्रदान करण्यात अपयश, प्रभावी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि कचरा विल्हेवाट लावण्यात सरकारचे अपयश यावरही युरी आलेमाव यांनी मांडलेल्या दुरूस्ती प्रस्तावात भर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com