International Yoga Day 2024
International Yoga Day 2024  Dainik Gomantak
गोवा

International Yoga Day 2024 : योगासन स्पर्धेत वाडे, नेत्रावळी विद्यालयांना यश

गोमन्तक डिजिटल टीम

International Yoga Day 2024:

सांगे, १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य संचालनालयाच्या आयुष विभागाच्या सहकार्याने सांगे आरोग्य केंद्राने घेतलेल्या योगासन स्पर्धेत ११ वर्षाखालील गटात सरकारी हायस्कूल, वाडे व १६ वर्षाखालील गटात सरकारी हायस्कूल, नेत्रावळी यांनी चषक पटकावले.

११ व 16 वर्षाखालील मुले आणि मुलींचे गट या स्पर्धेत सहभागी झाले होते. ८ शाळांतील ९१ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. परीक्षक म्हणून कल्पेश मुळगावकर, संजय नाईक

रामा नाईक व छाया जंगली यांनी काम पाहिले.

बक्षिस वितरण समारंभाला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, डॉ. मीनल जोशी, डॉ. ममता काकोडकर, नगराध्यक्षा अर्चना गावकर, योग प्रशिक्षक गंगाराम लांबोर, सत्यम कोसंबे, डॉ. सुषमा गावस देसाई,

डॉ. दिव्या भंडारी, डॉ स्वामिनी रायकर, डॉ. समृद्धी कवठणकर व डॉ. सुप्रिया पाटील हजर होते. प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन विजेत्यांना पदक आणि पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. सुषमा देसाई यांनी केले. आभार गंगाराम लांबोर यांनी मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT