Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa pre primary Teachers Salary Issue: राज्‍यातील पूर्व प्राथमिक शिक्षकांच्‍या वेतनाच्‍या प्रश्‍‍नावरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर सोमवारी पुन्‍हा आक्रमक झाले.
Goa pre primary Teachers Salary Issue
Teachers Salary IssueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍यातील पूर्व प्राथमिक शिक्षकांच्‍या वेतनाच्‍या प्रश्‍‍नावरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर सोमवारी पुन्‍हा आक्रमक झाले. शिक्षिकांसह त्‍यांनी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेत, आठ दिवसांत शिक्षिकांच्‍या वेतनवाढीसंदर्भातील फाईलला सरकारची मंजुरी मिळवून घेण्‍याची मागणी त्‍यांनी केली.

संचालक झिंगडे यांच्‍या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर म्‍हणाले, ‘‘पूर्व प्राथमिकच्‍या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सुमारे तीन हजार शिक्षिका २०१२ पासून आपल्‍या न्‍याय-हक्‍कांसाठी झगडत आहेत. राज्‍य सरकारने अनुदानित शाळांतील प्राथमिक शिक्षकांना अनुदान दिले; परंतु पूर्व प्राथमिक शिक्षिकांना बाहेर ठेवून त्‍यांच्‍यावर अन्‍याय केला.

Goa pre primary Teachers Salary Issue
Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

२०२२ पासून राज्‍यात लागू झालेल्‍या नव्‍या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन पातळी अतिशय महत्त्‍वाची असते. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ही बाब मान्‍य केलेली आहे. तरीही या पातळीवर मोडणाऱ्या बालवाटिका एक, दोन आणि तीनमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षिकांची सरकार दखल घेत नाही, हे दुर्दैवी आहे.’’

गत अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शिक्षिकांच्या नोंदणीची हमी दिली होती. मात्र, अर्ज अद्याप सरकारला सादर झालेला नाही. संचालकांनी आठ दिवसांची मुदत मागितल्याचे पाटकर यांनी सांगितले. यावेळी जॉन नाझारेथ, मनिषा उसगावकर आदीही उपस्‍थित होते

Goa pre primary Teachers Salary Issue
Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

...म्‍हणून संस्‍था पालकांकडून घेतात पैसे!

‘‘पूर्व प्राथमिकच्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या सुमारे तीन हजार शिक्षिकांना वाढीव वेतनाचा लाभ मिळालाच पाहिजे; परंतु सरकारने त्‍यांच्‍याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मोठमोठे इव्‍हेंट करण्‍यास सरकारकडे पैसे आहेत. पण, या शिक्षकांना देण्‍यासाठी सरकारकडे पैसा नाही. त्‍यामुळे या शिक्षिकांचा प्रश्‍‍न सोडवण्‍यासाठी आम्‍ही सरकारवर दबाव वाढवणार आहोत. सरकारकडून या शिक्षिकांना वेतनासाठी अनुदान मिळत नसल्‍याने शिक्षण संस्‍था त्‍यांच्‍या वेतनाचे पैसे पालकांकडून वसूल करीत आहेत’’, असा दावाही अमित पाटकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com