International Purple Fest Goa 2025 Dates Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: ‘पर्पल फेस्ट’ रंगणार ऑक्टोबरमध्ये! जाणून घ्या तारखा; नोंदणीसाठी क्लिक करा..

International Purple Fest Goa 2025 Dates: दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचा व कर्तृत्वाचा गौरव करणारा ‘इंटरनॅशनल पर्पल फेस्ट गोवा २०२५’ पणजीत ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचा व कर्तृत्वाचा गौरव करणारा ‘इंटरनॅशनल पर्पल फेस्ट गोवा २०२५’ पणजीत ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ॲपवर आधारीत नोंदणीची सुरवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आली.

यंदाची संकल्पना आहे ‘थिंक इन्क्लुझिव्ह – युनिव्हर्सल डिझाईन फॉर ऑल’. हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता सर्वसमावेशकता, नवोन्मेष आणि ग्रामीण सहभाग यांचा जागर करणारे चळवळ बनणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासोबत त्या खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, सचिव प्रसन्न आचार्य, आयुक्त गुरुप्रसाद पावसकर व संचालक वर्षा नाईक होत्या.

हा भव्य उपक्रम भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्तींचा सशक्तीकरण विभाग, गोवा राज्य विकलांग आयुक्त कार्यालय व संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. गोवा मनोरंजन संस्था ही अधिकृत स्थळ भागीदार आहे.

या महोत्सवाची नोंदणी फक्त मोबाईल अ‍ॅपद्वारे (https://purplefest.goa.gov.in/) करता येणार आहे. IPFG हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरही उपलब्ध आहे. गेल्या वर्षी नोंदणी केलेल्यांची लगेच नोंदणी होईल नव्‍याने नोंदणी करणाऱ्यांना काही माहिती द्यावी लागेल.मुख्यमंत्री म्हणाले, ‘युनिव्हर्सल डिझाईन ही केवळ रचना नसून ती समावेशकतेची नवी व्याख्या आहे.’

विविध नाविन्यपूर्ण उपक्रम

या फेस्टमध्ये विविध झोन व पॅव्हिलियनद्वारे युनिव्हर्सल डिझाईनची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी करता येते, हे दाखवले जाईल. विद्यार्थ्यांसाठी ‘डिझाईन फॉर ऑल चॅलेंज’ तर ‘पर्पल थिंक टँक’, ‘पर्पल एक्स्पीरियन्स झोन’, ‘पर्पल फन’, ‘पर्पल रेन’, ‘पर्पल स्ट्रीट’, ‘पर्पल स्पोर्ट्स’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांतून सहभाग, सांस्कृतिक रंग आणि संवादाचा अनुभव घेता येणार आहे. १०० हून अधिक स्टॉल्समध्ये उपकरणे, सेवा व सहाय्यक तंत्रज्ञान सादर होणार असून, कलासंस्कृतीचा भाग म्हणून ‘पर्पल कॅलेडोस्कोप’ अंतर्गत संगीत, नृत्य, चित्रकला आणि कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT