Purple Fest: राष्ट्रपती भवनाने घेतली गोव्यातील पर्पल फेस्टची दखल; आता सरकारी नोकरीसाठी..

Subhash Phal Dessai: दिव्यांगांच्या सरकारी नोकरीसाठी तयारी सुरु
Subhash Phal Dessai
Subhash Phal DessaiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Subhash Phal Dessai: राज्यातील दिव्यांग व्यक्तींचा डाटा लवकरच तयार करण्यात येणार असून त्यात त्यांचे शिक्षण, वय, कौशल्य आदींची माहिती असणार आहे. दिव्यांगांना सरकारी नोकरी देताना हा डाटा महत्वपूर्ण ठरणार असल्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रपती भवनासह अनेक राज्यांकडून गोव्यातील पर्पल फेस्टची दखल घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रपती भवन देखील अशाप्रकारचे फेस्ट आयोजित करण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती फळदेसाईं यांनी दिली.

Subhash Phal Dessai
ISL Football Tournament: हेर्रेरा हैदराबादविरुद्ध बेंचवर राहण्याचे संकेत

काही महिन्यांपूर्वी राज्याने दिव्यांगजनांसाठी रोजगार संधींच्या निर्मितीसाठी आणि दिव्यांगांना उद्योग क्षेत्रांमधील कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने एक महत्वाचं पाऊल उचललं होतं.

राज्य दिव्यांगजन आयोगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बेंगळुरू येथील ‘एनेबल इंडिया’ या एनजीओशी सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्‍या होत्या.

तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिव्यांगांना सक्षम बनवण्याचे सरकारचे ध्येय असल्याचेही यापूर्वीच सांगितले होते. समाजकल्याण खात्याकडून घेण्यात आलेल्या या माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीं सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa postmen daily wage
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Subhash Phaldesai Delhi Meeting
Subhash Phal Dessai Curchorem visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com