International Purple Festival : आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट ; दिव्यांगजनांचे सशक्तीकरण करताना

International Purple Festival : हा महोत्सव म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खाती आणि यंत्रणांच्या सहकार्याचा एक मिलाफ ठरला.
Cm Pramod Sawant
Cm Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

International Purple Festival

गोव्याने आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हलचे यजमानपद यशस्वीरित्या पेलताना या सहा दिवसीय महोत्सवात अपंग व्यक्तींसाठी जल्लोष साजरा करण्याबरोबरच सशक्तीकरणही केले.

अपंगत्वाच्या सर्व २१ प्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या या महोत्सवाने या सर्वांना त्यांच्यातील गुणवत्तेचे दर्शन घडविण्याची संधी या व्यासपीठाने उपलब्ध केली आणि त्यांच्या अंगातील आगळ्या क्षमतांचे त्यामुळे साजरीकरण करण्याची त्यांना संधी मिळाली.

हा महोत्सव म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खाती आणि यंत्रणांच्या सहकार्याचा एक मिलाफ ठरला. त्यात अपंग व्यक्ती राज्य आयोगाचे कार्यालय, गोवा सरकारचे समाज कल्याण खाते आणि केंद्र सरकारचे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचे अपंग व्यक्ती सशक्तीकरण खाते यांचा समावेश होता.

जगभरातील ८००० हून अधिक प्रतिनिधींचा या महोत्सवात सहभाग होता. त्यातून वैविध्य आणि समावेशकता यांचे आगळे साजरीकरण पहायला मिळाले.

या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हलमध्ये विविधांगी उपक्रम, उद्‌बोधक कार्यशाळा, प्रदर्शने आणि चित्रपट यांची रेलचेल दिव्यांगजनांना अनुभवता आली. या महोत्सवात देशातील पहिल्या क्लाऊड बेज्ड डिजेबिलिटी इन्फॉर्मेशन लाईन (डीआयएल) चे सादरीकरण झाले. यामुळे या महोत्सवाने एक मैलाचा दगड पार केला.

Cm Pramod Sawant
Goa Mining Case: पर्यावरणीय आघात मूल्यांकन अहवाल खोटा

या महोत्सवादरम्यानच पर्पल टिव्ही भारत हा समर्पित चॅनलही सादर करण्यात आला. त्याद्वारा जगभरातील अपंगत्व असलेल्या व्यक्ती-समुदायाच्या कल्पना-विचार, यशदायी कहाण्या आदींचे दर्शन घडविले जाणार आहे.

या महोत्सवाने सहाय्य साधनांपासून अपंग व्यक्तींच्या असीम क्षमतांना पाठबळ, प्रोत्साहन दिले आणि त्यांचे प्रदर्शनही घडवलेले पहायला मिळाले. या महोत्सवाचा समारोप विजयी मोहीम फत्ते झाल्याच्या दखल घेण्याने झाला. त्याचबरोबर जागतिक विविधतेच्या आणि समावेशकतेच्या संदेशासह गोव्यावर दीर्घकाळ रेंगाळणारा प्रभाव पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com