Goa Interglobe Hotels ibis: इंटरग्लोब हॉटेल्सने उत्तर गोव्यात ibis Styles Goa Vagator हे नवीन हॉटेल सुरू केले आहे. इंटरग्लोब हॉटेल्सचे ibis Styles चे हे भारतातील २३ वे हॉटेल आहे.
कंपनीने त्यांची पॅरेंट कंपनी असलेल्या Accor या कंपनीसोबत भागीदारीत हे हॉटेल सुरू केले आहे.
Accor ही युरोपमधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. तर जगातील हॉस्पिटॅलिट क्षेत्रात ही कंपनी सहाव्या स्थानी आहे.
ibis Styles Goa Vagator मध्ये 142 खोल्या आहेत. इंटरग्लोब हॉटेल्सचे अध्यक्ष आणि सीईओ जे. बी. सिंग म्हणाले की, "या जागतिक दर्जाच्या हॉटेलमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. विचारपूर्वक डिझाइन केलेल्या या खोल्या आहेदत. येथे मुबलक सार्वजनिक जागा आहेत. सर्व सोयीसुविधा उच्च दर्जाच्या आहेत.
"आमच्या देशभरातील सर्व हॉटेल्सप्रमाणेच ibis Styles Goa Vagator ची आधुनिक जीवनशैली गोव्यातील पर्यटकांना आकर्षित करेल. पर्यटकांना डोळ्यासमोर ठेऊनच काळजीपूर्वक याची उभारणी केली आहे. उत्कृष्ट डिझाइनचा अनुभव देण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
Accor कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुनीत धवन म्हणाले की, "Ibis कुटुंबातील ही नवीन जोडणी आहे. खास आदरातिथ्य प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे. या वचनबद्धतेतील हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे."
“या पर्यटन सीझनमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात येण्याची अपेक्षा ठेवून हॉटेल सुरू केले आहे. पर्यटकांना विश्रांतीचा येथे सुंदर अनुभव मिळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.