Goa Students Eye Surgery: गोव्यातील 300 शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर होणार शस्त्रक्रिया

तपासणीत आढळला होता दोष; दिवाळी सुट्टीनंतर मोफत शस्त्रक्रिया
Goa Students Eye Surgery
Goa Students Eye SurgeryDainik Gomantak

Goa Students Eye Surgery: गोव्यातील 300 शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गोवा सरकारतर्फे या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व अनुदानित आणि सरकारी शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करण्यात आली होती. तेव्हा या 300 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये दोष असल्याचे समोर आले होते.

त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार, हे स्पष्ट झाले होते. आता राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन ही शस्क्रक्रिया पार पाडणार आहे.

Goa Students Eye Surgery
Goa Agriculture Policy: शॅक धोरणानंतर आता कृषी धोरण; जानेवारीपर्यंत तयार होणार राज्याची अ‍ॅग्रीकल्चर पॉलिसी

तेव्हा सुमारे 2 लाख 30 हजार विद्यार्थ्यांची डोळे तपासणी झाली होती. त्यातून 38 हजार विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले होते. तर त्या 38 हजारातील 15 हजार विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले होते. तर 300 जणांवर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.

गोवा सरकारद्वारे अंधत्व रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले जात आहेत. सर्वांसाठी दृष्टी (व्हिजन फॉर ऑल) योजने अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून आरोग्य खाते आणि इतर संघटनांच्या माध्यमातून अनेक शिबिरे राबविली जातात.

Goa Students Eye Surgery
Goa University: गोवा विद्यापीठात जानेवारीपर्यंत उभारणार रिसर्च पार्क; Bio-Engg मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणार...

दरम्यान, जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर योजना राबविणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा उपक्रम नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.

भारताला अंधत्वातून मुक्त करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत, तेव्हा मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com