Inter-state betting scam India 
गोवा

UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

Uttar Pradesh Crime News: अटक संशयितांच्या अनेक राज्यांमध्ये सायबर फसवणुकीबाबत दाखल असलेल्या तक्रारींमुळे त्यांची खाती गोठवण्यात आल्याचे चौकशीत समोर आले.

Pramod Yadav

उत्तर प्रदेश: बांदा पोलिसांनी ऑनलाइन बेटिंग आणि सायबर फसवणुकीत सहभागी असलेल्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत, मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. ही टोळी गोव्यातून काम करत होते.

पोलिसांनी एका प्रसिद्ध हिंदी वृत्तत्राला दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार आकाश उर्फ ​​रजनीश कुमार द्विवेदी हा छत्तीसगडमधील रायपूरचा रहिवासी आहे. तो उत्तप्रदेशातील बांदा, चित्रकूट, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आपले एजंट तयार करायचा.

हे एजंट विविध लोकांना १०-१५ हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते, पासबुक आणि एटीएम कार्ड याची माहिती घेत. सायबर फसवणुकीतून मिळालेले पैसे ट्रान्सफर करण्यासाठी या खात्यांचा वापर केला जात होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी बांदा - चित्रकूट येथील दीपक कुमार, कृष्ण कुमार कुशवाह आणि राजकुमार सोनकर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चेकबुक, पासबुक, तीन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि १६ बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अटक संशयितांच्या अनेक राज्यांमध्ये सायबर फसवणुकीबाबत दाखल असलेल्या तक्रारींमुळे त्यांची खाती गोठवण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. सध्या पोलिस मुख्य सूत्रधार आकाशला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT