Seaferer in goa will get insurance cover of 50 lacs Dainik Gomantak
गोवा

खलाशांसाठी तब्बल 50 लाखांच्या विम्याची योजना लॉन्च

सध्या कार्यरत असलेल्या 55 वर्षांपर्यंतच्या खलाशांना याचा थेट लाभ

दैनिक गोमन्तक

पणजी : खलाशांच्या राष्ट्रीय संघटनेकडून 50 लाख रुपयांची विमा योजना लॉन्च करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेल्या 55 वर्षांपर्यंतच्या खलाशांना याचा थेट लाभ मिळणार आहे. महासंचालक अमिताभ कुमार यांनी नुकतीच NUSI सुरक्षा कवच नावाची विमा योजना लॉन्च केली आहे. एलआयसीच्या माध्यमातून ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. (Seaferer in goa will get insurance cover of 50 lacs News Updates)

जर एखाद्या खलाशाने एलआयसीची (LIC) जीवन अमर पॉलिसी घेतली तर त्याच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यूनंतरही 25 लाख रुपयांची भरपाई मिळेल, अपघाती मृत्यूनंतर 50 लाखांची तरतूद या पॉलिसीमध्ये करण्यात आली आहे. 55 वर्षांखालील खलाशी कमीत कमी 10 वर्षांसाठी विमा पॉलिसी घेऊ शकतात. यातील अर्धा हिस्सा NUSI संघटना खलाशाच्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत भरणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. संघटनेचा कोणताही सक्रीय सभासद ज्याला मागील 5 वर्षात किमान 24 महिन्यांचा अनुभव आहे, तो सभासद विम्यासाठी (Insurance) पात्र ठरणार आहे.

खलाशांना पॉलिसीचा लाभ तेव्हाच मिळणार आहे, जेव्हा ती जहाजावर ड्युटी बजावत असतील. सुट्टीवर असताना झालेल्या मृत्यू (Death) किंवा दुखापतीसाठी कोणतीही तरतूद या पॉलिसीमध्ये करण्यात आलेली नाही. मात्र संघटनेकडून या तरतुदीसाठीही प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. संघटनेच्या 125 व्या वर्षपूर्तीनिमित्त हे खलाशांना गिफ्ट असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT