IFFI Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2023: बॉलिवूड निर्मात्यांऐवजी ‘इफ्फी’त दुर्लक्षितांना स्थान द्या!

IFFI Goa 2023: अरविंद सिन्हा: माहितीपटांची संख्या वाढली; पण दर्जा घटला

Shreya Dewalkar

IFFI Goa 2023: बॉलीवूडमधील अभिनेते सदोदित प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांच्याकडे प्रसिद्धीसाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत. करण जोहर वगैरे अभिनेत्यांना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘इफ्फी’ची आवश्‍यकता का भासली? सरकारने देशातील करदात्यांच्या पैशाचा योग्य वापर करत दर्जेदार चित्रपट तसेच दुर्लक्षितांना ‘इफ्फी’त स्थान देणे गरजेचे आहे.

असे प्रतिपादन माहितीपट आणि लघुपट ज्युरीचे अध्यक्ष अरविंद सिन्हा यांनी केले. यंदा लघुपट आणि माहितीपट गटात लघुपट अतिशय कमी आले आहेत. तरूणाईला झटपट काम करायचे आहे, त्यामुळे माहितीपटांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, दर्जा घटल्याचेही त्यांनी सांगितले.

गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते चित्रपट निर्माते करण जोहर यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘इफ्फी’च्या व्यासपीठाचा वापर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. यावेळी ज्युरी सदस्य पौशाली गांगुली, बॉबी वाहमाम, अरविंद पांडे व इतर सदस्य उपस्थित होते.

तरूणांना भावणारे माहितीपट यावेत !

आजच्या तरूणाईला आवडणारे माहितीपट बनविणे आवश्यक आहे. काही काळ माहितीपट पाहिल्यानंतर कंटाळा येता कामा नये. येत्या काळात असे माहितीपट निर्माण होणे आवश्यक आहेत, जे तरूणाईला आकर्षित करतील, असे प्रतिपादन पौशाली गांगुली यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT