Karan Johar: स्वातंत्र्य लढ्यातील अनामिक नायकांची कथा : ‘ए वतन मेरे वतन’; करण जोहर

Karan Johar: स्वातंत्र्य लढ्यातील अनेक अनामिक नायकांची कथा लोकांना सांगणे आवश्यक आहे, असे चित्रपट निर्माता करण जोहर म्हणाले.
Karan Johar
Karan JoharDainik Gomantak
Published on
Updated on

Karan Johar: ''ए वतन मेरे वतन’ चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम नक्कीच मिळेल. हा चित्रपट बनवण्याचा निर्णय हा एक सर्जनशील प्रयोग आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक अनामिक नायकांची कथा लोकांना सांगणे आवश्यक आहे, असे चित्रपट निर्माता करण जोहर म्हणाले.

Karan Johar
Indian Panorama: ‘इंडियन पॅनोरोमा’ हा भारतीय चित्रपटसृष्टीचा आरसाच !

‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाचे निर्माते करण जोहर, अभिनेत्री सारा अली खान आणि इतरांच्या आगामी चित्रपटाबाबत मंगळवारी सकाळी कला अकादमीत आयोजित संवादात्मक सत्रात प्रेक्षकांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.

करण जोहर म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांनी धर्मा प्रोडक्शनद्वारे बनवलेल्या काही चित्रपटांमधून आमची देशभक्ती दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ए वतन मेरे वतन’ची कथा माझ्यासमोर आणली, तेव्हा ती ऐकून अश्रू अनावर झाले. चित्रपटाची कथा भावना आणि देशभक्तीने भरलेली होती. सारा अली खानने तिची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे.

सारा अली खान म्हणाली की, इतिहासाची विद्यार्थिनी असल्याने तिला माहीत आहे की, या देशाचा खूप मोठा इतिहास आहे. असे अनेक नायक आहेत, ज्यांच्या कथा लोकांना सांगणे आवश्यक आहे. या चित्रपटातून देशभक्तीचे दर्शन घडणार आहे. मी एक बोल्ड मॉडर्न मुलगी आहे; पण स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्याकडून प्रेरित भूमिका साकारण्यासाठी माझी देहबोली, , लूक आदींवर काम करावं लागलं.

आजची पिढी ‘जनरेशन झेड’!

‘जनरेशन झेड’ विषयी निर्माते करण जोहर यांनी सांगितले की, आजची पिढी जिला ‘जनरेशन झेड’ म्हणून संबोधले जाते, ती अतिशय तेजस्वी आणि चित्रपट आणि चित्रपटांबद्दल अधिक संशोधन करणारी आहे. ही पिढी त्यांच्या हक्कांसाठी उभी राहते आणि जे योग्य आहे, त्यासाठी लढते. ‘ए वतन मेरे वतन’ सारखा चित्रपट बनवणे हा सृजनशील निर्णय आहे. कारण मला वाटते, की स्वातंत्र्यलढ्याची ही कहाणी लोकांनी पाहणे आणि अनुभवणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com