Pilerne Fire | Fire in Goa Paint Factory Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire: पिळर्ण परिसरातील हवेची प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी; काय म्हटलंय अहवालात घ्या जाणून...

2 किलोमीटर परिसरातील लोकांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांची मुदत वाढवली

Akshay Nirmale

Pilerne Fire: पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. या कंपनीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तथापि, गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून (GSPCB) या परिसरातील हवेची तपासणी करण्यात आली आहे आणि GSPCB ने याबाबतचा अहवालही दिला आहे. (Fire in Goa Paint Factory)

या अहवालात म्हटले आहे की, येथील हवेत प्रदुषण नाही. हवेतील सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत. हवा शुद्ध आहे. तथापि, आणखी दोन ते तीन दिवस येथील हवेची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती GSPCB चे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

दरम्यान, आग लागलेल्या घटनास्थळापासून २ किलोमीटर परीघातील परिसरातील रहिवाशांसाठी ज्या मार्गदर्शक सूचना सरकारच्यावतीने देण्यात आल्या होत्या, त्याची मुदत आणखी ७२ तासांसाठी वाढवली आहे.

आग अजूनही धुमसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

या आगीत बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. कंपनीचे प्रोसेसिंग युनिट पुर्णतः जळून खाक झाले आहे. आगीत 40 दुचाकी भस्मसात झाल्या असून कंपनीचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

4 टन फोम आणि 12 लाख लीटर पाणी वापरून फायर ब्रिगेड, संरक्षण विभाग, नौदल, मुरगाव पोर्ट ट्रस्ट अशा विविध विभागातील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी ही आग नियंत्रणात आणली. राज्यातील अग्निशमन विभागांतील सर्व सुमारे 40 बंब ही आग विझवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT