Inquiry of income tax inspectors to be summoned by Panaji police tomorrow Danik Gomantak
गोवा

आयकर निरीक्षकांची उद्या चौकशी, पणजी पोलिसांकडून समन्स

तक्रारीमुळे निरीक्षकांचे धाबे दणाणले

दैनिक गोमन्तक

पणजी : आयकर कार्यालयामधील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत गोव्यातील आयकर विभागाच्या तीन निरीक्षकांना चौकशीसाठी उद्या 10 मे रोजी सकाळी पोलिस स्थानकात उपस्थित रहा अशी नोटीसवजा समन्स पणजी पोलिसांकडून त्यांच्या कार्यालयीन पत्त्यावर काल पाठवला गेला आहे. ते उपस्थित न राहिल्यास पुढील कारवाई सुरू केली जाईल अशी माहिती महिला पोलिस उपनिरीक्षक लॉरेन सिक्वेरा यांनी दिली. (Inquiry of income tax inspectors to be summoned by Panaji police tomorrow)

आयकर निरीक्षकांनी या पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा तसेच वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. संशयित मनिंदर अत्तारी व दिपक कुमार या दोघांनी तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करण्याचा व काही अश्‍लिल संदेश मोबाईलवरून पाठवले आहेत. हे संदेश पुरावा म्हणून पीडित महिलेने तक्रारीसोबत जोडले आहेत. त्यामुळे ते दोघेही चांगलेच अडचणीत आले आहेत. तिसरा संशयित आदित्य वर्मा हा या पीडित महिलेला येताना-जाताना वाईट नजरेने पाहायचा त्यामुळे त्याच्यावरील गुन्हा काही प्रमाणात सौम्य आहे.

आयकर खात्यांतर्गत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरू झाली आहे. हे प्रकरण संशयितांनी तिला धमक्या देऊन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित महिलेने त्याला न जुमानता थेट पोलिस स्थानका तक्रार दिल्याने या निरीक्षकांचे धाबे दणाणले आहेत. या खात्याच्या आयकर आयुक्तांनी या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. मात्र पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल करण्यापूर्वी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली होती. मात्र, तिच्या या तक्रारीच अधिक दखल न घेता ती हसण्यावारी घेण्यात आली होती. पीडित महिला ही गोमंतकीय आहे तर तिचे वरिष्ठ अधिकारी हे बिगर गोमंतकिय आहेत. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनी तिच्यावरच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. मात्र या अधिकाऱ्यांना अद्दल
घडवण्यासाठी तिने शुक्रवारी (6 मे) उशिरा पोलिसांत तक्रार दाखल केली व त्यानंतर तपासाची सुत्रे वेगाने सुरू झाली आहेत. ही गंभीर बाब असल्याने पणजी पोलिसही सर्व बाजू तपासून पाहत आहेत.

या आयकर विभागाच्या वरिष्ठ आयुक्त या महिला आहेत. दोन महिन्यापासून हे लैंगिक अत्याचार प्रकरण सुरू आहे. तक्रार देऊनही तिला इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तापर्यंत पोहचू दिले नाही. तसेच आयुक्त काही दिवस रजेवर असल्याने ही तक्रारच गायब करण्यात आली. तिला संशयितांनी धमकावण्यात सुरुवात केली. तक्रार दिल्यास पुढील परिणाम नोकरीवर होऊ शकतो असे बजावले होते. मात्र या बिगर गोमंतकिय अधिकाऱ्यांना गोव्यातील मुली किती खंबीर आहेत याचा अनुभव या अधिकाऱ्यांना आल्याने त्यांची पळापळ सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT