Court order  Dainik Gomantak
गोवा

खून प्रकरणातून वास्कोतील कामगाराची निर्दोष मुक्तता

कामगाराला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: दारूच्या नशेत झालेल्या भांडणात दुसऱ्या एका कामगाराच्या डोक्यात दंडुका हाणून त्याचा खून करण्याचा आरोप असलेल्या खारीवाडो वास्को येथील मिथुन उर्फ समीर या मूळ उडिशा येथील कामगाराला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. (Vasco News)

अकूब लागून उर्फ राजू या दुसऱ्या उडिशाच्याच कामगाराचा खून केल्याच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर खुनाच्या आरोपाखाली खटला चालू होता.

संशयिताला निर्दोष मुक्त करताना न्या. डिसिल्वा यांनी पोलिसांनी (Police) संशयिताला लगेच अटक केली असली तरी ज्या दंडुक्याने हा खून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला त्यावर संशयिताचा हाताचे ठसे न सापडल्याने तसेच संशयिताच्या कपड्यावर (Clothes) मयताच्या रक्ताचे नमुने न मिळाल्याने हा खून त्यानेच केला हे निसंधीग्धपणे सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे संशयिताला संशयाच्या फायदा देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी वास्कोचे (Vasco) तत्कालीन पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी तपास केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT