Kulan Sarvan Leopard  Dainik Gomantak
गोवा

Leopard Spotted: भर रस्त्यावर आला बिबट्या! कुळण परिसरात वाहनचालकांची भंबेरी; डिचोली अपघातातील जखमी असल्याची शंका

Kulan Sarvan Leopard: कुळण परिसरात अनेकांना भर डिचोली-साखळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन घडले. या बिबट्याच्या उजव्या बाजूचा मागील पाय मोडला आहे.

Sameer Panditrao

Kulan Sarvan Leopard Spotted

डिचोली: डिचोली शहरातील बोर्डे परिसरात जखमी बिबट्याचा संचार असल्याची चर्चा असतानाच आता कुळण-सर्वण परिसरात एक जखमी बिबट्या असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी कुळण परिसरात अनेकांना भर डिचोली-साखळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन घडले. या बिबट्याच्या उजव्या बाजूचा मागील पाय मोडला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

बारा दिवसांपूर्वी बोर्डे येथे एका कारला आपटल्याने एक बिबट्या जखमी झाला होता. अपघात घडला होता, तेथून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर कुळण-सर्वण परिसरात दिसलेला बिबट्या बोर्डे अपघातातील जखमी तर नाही ना? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

कुळण येथे ‘खुरीस’ परिसरात शनिवारी सायंकाळी एक बिबट्या रस्ता ओलांडत होता. बिबट्या दिसताच वाहनचालकांची भंबेरी उडाली.

रस्ता ओलांडून बिबट्या जाईपर्यंत वाहनचालकांनी वाहने थांबवली. ॲनिमल रेस्क्यू स्कॉडचे अमृत सिंग यांची कन्या अक्षता हिलाही या बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्या मागील पायाला इजा झाल्याने तो लंगडत होता,असे तिने सांगितले.

वन्य पशू वारंवार लोकवस्तीत

जंगली पशू जसे की, बिबट्या, गवे तसेच जंगलातील अन्य हिंस्त्र पशूंचे लोकवस्तीत वारंवार दर्शन घडत असल्याने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. सरकारने वन्यजीवांचा लोकवस्तीतील संचार रोखण्यासाठी कृती करावी, तसेच त्यांचा नैसर्गिक अधिवास अबाधित रहावा, यासाठी जंगलतोड थांबवण्याची गरज आहे, असे बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर अनेकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT